
कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ ढाकणे अनेक दिवसापासून कोपरगाव येथे गोदावरी स्वच्छता अभियान राबवीत आहे.अशा या पवित्र नदीवर अनेक भागातून भाविक भक्त धार्मिक कार्यक्रमासाठी येत असतात.कोपरगाव हि संताची भुमी आहे.कोपरगावला दक्षिण भारताची काशी असेही म्हटले जाते. त्यामुळे कोपरगाव येथे गोदावरी नदीला अन्यन साधारण महत्व आहे. आपल्या कोपरगाव शहरामधून पवित्र दक्षिण गंगा गोदावरी नदी वाहते. तिचे धार्मिक आणि पौराणिक दृष्टया महत्व अनन्य साधारण आहे.यासाठी काही उपाय योजना होणे गरजेचे आहे. यासाठी गोदामाई प्रतिष्ठाचे संस्थापक अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना निवेदन दिले आहे .या निवेदनात पुढील मागण्या केल्या आहेत.
१) पवित्र गोदावरी नदी प्रदूषण मुक्त वाहावी या बाबत ठोस निर्णय घ्यावा.
२) रक्षा विसर्जन करिता स्वतंत्र्य कुंड करणे.
३) संत जनार्धन स्वामी मौनगिरी सेतू लहान पूलच्या दोन्ही बाजूस जाळी बसवणे.
४) महिलांना नदीत स्नाना नंतर कपडे बदलण्यास कायम स्वरूपी व्यवस्था करणे.
५) श्री स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूचा रस्ता बंद करणे.
६) शहरातील नाल्याच्या पाण्यावर प्रक्रियाकेंद्र कार्यन्वित (STP/SFTP) करणे, जेणे करून नाल्यांचे पाणी पवित्र गोदावरी नदी मध्ये येणार नाही.
७) श्री गणेश विसर्जना नंतर नदी प्रदूषणात भर पडू नये त्या संबंधी उपाय योजना करणे.

अशा मागण्या केल्या असुन दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र गोदावरी नदीचे पावित्र राखण्यासाठी वरील उपाय योजना कायमस्वरूपी करव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
