कोपरगांवात दि.१९ नोव्हेंबर रोजी एकलव्य विद्यार्थी संघटनेची बैठक:- उत्तर नगर जिल्हाध्यक्ष गोरख नाईक…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:- एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष तथा म्हाडा अध्यक्ष नाशिक विभागीय मा.ना. शिवाजीराव ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश महासाचिव किरण ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एकलव्य विद्यार्थी संघटना बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी प्रमुख उपस्थिती प्रदेश संघटक अशोक माळी , उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष गोरख नाईक ,युवा जिल्हा कार्याध्यक्ष भावराव पवार,युवा जिल्हा सचिव दिपक ठाकरे यांच्या उपस्थिती बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांवर होणारे अन्याय अत्याचार या विरोधात न्याय मिळण्यासाठी संघटनेचे काम चालू आहे शिवाजीराव ढवळे यांनी विद्यार्थी संघटनेचा एक स्वतंत्र विभाग तयार करण्याचे ठरवले असून विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी जातीचा दाखला, जात पडताळणी, प्रवेश संदर्भात अडचणी , स्कॉलरशिप , विविध अडचणी येत असतात हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी एकलव्य विद्यार्थी संघटना नक्कीच प्रयत्न करणार आहे. समाजातील विद्यार्थी यांच्यावर सतत अन्याय अत्याचार होत असतो तो होणारा अन्याय अत्याचार कुठेतरी थांबला पाहिजे त्यासाठी एकलव्य विद्यार्थी संघटनेची सुरुवात केली आहे. एकलव्य विद्यार्थी संघटनेच्या कोपरगाव तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी व विद्यार्थ्यांनी दिनांक 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता बुद्धविहार कोपरगांव या ठिकाणी उपस्थित रहावे असे आवाहन एकलव्य विद्यार्थी संघटना कोपरगांव तालुका कार्याध्यक्ष निलेश ठाकरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *