कोरोना विषयक समस्या सोडविण्यासाठी मदत व्हावी; उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, यांच्याकडे विवेकभैय्या कोल्हे यांची निवेदनाद्वारे मागणी…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
सध्या राज्यात कोविड-१९ संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून नागरिकांना या महामारीपासून दिलासा मिळावा यासाठी प्रशासनाकडून शासनाने वेळोवेळी दिल्या जाणा-या आदेशाचे नागरिकांनी पालन करावे यासाठी जनजागृती करुन विविध प्रकारच्या उपाययोजनाही केल्या जात आहे.कोपरगांव विधानसभा मतदार संघातही ही महामारी तीव्र गतीने वाढत असून अनेक कुंटुंबातील सदस्यांना या महामारीमुळे आपले प्राण गमवावे लागले आहे.कोरानाची लागण झालेल्या नागरिकांना वेळेवर ऑक्सिजन,तसेच इतर आरोग्य विषयक वैद्यकीय सेवा शासनाकडून प्राधान्याने उपलब्ध करुन द्याव्यात यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.नामदार अजितदादा पवार यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन कोपरगांव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन,जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी दिले.

सद्यस्थितीत कोरोनाची विविध लक्षणे दिसत असून त्यातून शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधीत रुग्ण आढळत आहे.कोपरगांव तालुक्यात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे गेल्या काही दिवसात रुग्णांसह नातेवाईकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागलेला आहे.हा त्रास कमी होण्यासाठी संगमनेर तालुक्यातील लोहारे येथील औद्योगिक वापरासाठी असलेला ऑक्सिजन प्लांट गेल्या काही दिवसापासून बंद होता.सदर प्लांटला वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठीची परवानगी मिळालेली असून सद्यस्थितीत कार्यान्वित झालेला आहे.या प्लांटला लागणारा लिक्वीड ऑक्सिजनचा पुरवठा हा आवश्यकतेप्रमाणे सुरळीत व्हावा यासाठी शासनाचे सहकार्य मिळावे अशी विनंती निवेदनाद्वारे केलेली आहे.
यासह कोरोना रुग्णालयांव्यतिरिक्त अन्य रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्याकडे उपचारासाठी येणा-या रुग्णांमध्ये कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास अशा रुग्णांची कोरोना चाचणी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन करुन घेणेसाठी नागरिकांना जागृत करणे गरजेचे आहे तसेच याबाबत शासनाने प्राधान्याने परिपत्रक काढून नियमावली जाहीर करावी जेणेकरुन कोरोना सदृश्य रुग्णांना वेळेत उपचार देणे शक्य होऊन संभाव्य रुग्णवाढीचा धोका टळण्यास निश्चितच मदत होईल अशी मागणी करुन विविध समस्यां उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्याकडे मांडल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *