दै.लोकमत समुहाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करून ६०७०६ युनिट उच्चांकी रक्त गोळा केल्याबद्दल दै.लोकमत समुहाचे व मिडिया चे चेअरमन विजयजी दर्डा यांना पत्र देऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- लोकमत वृत्तपत्र समुहाच्या वतीने विशेष मोहिमेंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करून ६०७०६ युनिट रक्त गोळा करण्यात आले आहे. या मोहिमेसाठी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पत्र देऊन लोकमत वृत्तपत्र समूहाचे अभिनंदन करण्यात आले. लोकमत समूहाचे आणि लोकमत मीडियाचे चेअरमन श्री. विजय दर्डा यांनी पत्र स्वीकारले.

याप्रसंगी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,
आरोग्य मंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत,  उद्योगमंत्री सुभाष देसाई, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आदी उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *