
कोपरगाव प्रतिनिधी:- विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण
कोपरगांव:संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत अकॅडक्राफ्ट प्रायव्हेट लिमिटेड या कायदेशिर लेखापरीक्षण, कर सल्ला, बाजार संशोधन आणि जनमत सर्वेक्षण, व्यवसाय आणि व्यवस्थापन सल्लागार, इत्यादी क्षेत्रात कार्यरत असलेल्या आघाडीच्या कंपनीने संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या शैक्षणिक वर्ष २०२०- २१ मधिल अंतिम वर्षातील १६ विद्यार्थ्यांची आकर्षक पगारावर नोकऱ्यांसाठी निवड केली आहे. एका पाठोपाठ एक कंपनी संजीवनीच्या विद्यार्थ्यांची निवड करीत असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की मनुष्य जन्माला आल्यापासुन त्याचे प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण अशा टप्यांमधुन जावुन महाविद्यालयीन शिक्षणानंतर आपणास नोकरी कशी मिळेल या विवंचनेत ग्रासलेला असतो. पालकही आपला पाल्य स्थिर स्थावर कसा होईल याचा विचार करीत असतात. या सर्व बाबींचा विचार करून संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज ग्रामिण भागातील जास्तीत जास्त विध्यार्थ्यांना इंजिनिअरींगचे शिक्षण पुर्ण होताच नोकऱ्या मिळवुन देण्यासाठी मागिल अनेक वर्षांपासून अनोखा पॅटर्न राबवित असुन यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे नोकरदार होण्याचे स्वप्न पुर्ण होत आहे.
अलिकडेच अकॅडक्राफ्ट कंपनीने निवड केलेल्या विद्याथ्र्यांमध्ये अक्षय नारायण राजगुरू, भूषण मोहिनीराज मते, साक्षी महेंद्र उगले, गितांजली दत्तात्रय आखाडे, स्नेहल सदानंद पाटील, संकेत अरूण वहाडणे, अक्षय विलास थोरात, बाळासाहेब रामदास गावटे, प्रकाश संजय मार्के, प्रेरणा रूपेश नागपुरे, रोहित संजय सोनवणे, शुभम दिपक गडाख, सुषमा पंडीतराव सोनवणे, स्वप्नील सुनिल साळुंके, वैभव निळकंठ पाबळे व गणेश राजेंद्र गायकवाड यांचा समावेश आहे.
माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष श्री शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे तसेच काॅलेजचे डायरेक्टर डाॅ. ए.जी. ठाकुर व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.
