कोपरगाव प्रतिनिधी:-
गेल्या दोन वर्षापासून राज्यात पर्जन्यमान बरे असून चालू वर्षी पाऊस कमी जरी असला तरी काही ठिकाणी वरुणराजाने चांगली कृपा केली आहे, परिणामी शेतकऱ्यांना शेती पिकांना युरिया खताची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत आहे, तेव्हा कृभकोने महाराष्ट्र राज्याला अतिरिक्त जादा युरिया खताचा पुरवठा करावा अशी मागणी सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष व कृभको जनरल बॉडी प्रतिनिधी बिपिनदादा कोल्हे यांनी केली.
कृभको नवी दिल्लीची ४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने गुरूवारी पार पडली, त्यात अध्यक्ष डॉ. चन्द्रपाल सिंह यादव यांनी संबोधित केले, संजिवनी कारखाना कार्यस्थळावरून; बिपीनदादा कोल्हे यांनी त्यात ऑनलाईन पद्धतीने सहभाग नोंदवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा यांची देशाचे सहकार मंत्री म्हणून नियुक्ती केली त्याबद्दल त्यांचे महाराष्ट्र राज्याच्या वतीने अभिनंदनाचा ठराव श्री. कोल्हे यांनी मांडला. तसेच कृभकोने 20% लाभांश_डिव्हीडंट जाहीर केल्याबद्दल अध्यक्ष चंद्रपाल सिंह यादव यांचे कोल्हे यांनी अभिनंदन केले.
याप्रसंगी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष संभाजी गावंड, अमृत संजीवनी चे अध्यक्ष बाळासाहेब उर्फ पराग संधान, कोल्हे कारखान्यांचे साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, दत्तात्रय मोरे, नानासाहेब थोरात, कन्नड चे आर जी बी प्रतिनिधी भगवान काझी, गजानन घुले, कृष्णराव काळे, अहमदनगर जिल्हा कृभको प्रतिनिधी सुदर्शन पाटील, नाशिकचे प्रतिनिधी श्री. जांभूळकर आदी उपस्थित होते.
श्री. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, शेतकरी वर्गाची कृभकोने काळजी घेऊन त्यांना नियमित खतांचा पुरवठा करण्यात नेहमीच सहकार्य केलेले आहे. महाराष्ट्र राज्यात ७८ हजार ७३३ मे टन युरिया खताची विक्री झाली असून त्यात आणखीन मागणी वाढत आहे, तेव्हा कृभकोने महाराष्ट्र राज्यासाठी युरिया खताचा साठा वाढवून द्यावा अशी मागणी त्यांनी केली, शेवटी व्यवस्थापक हरिभाऊ गोरे यांनी आभार मानले.

फोटो ओळी:- कोपरगाव
कृभको नवीदिल्लीची ४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने गुरूवारी पार पडली, त्यात कोल्हे कारखाना कार्यस्थळावरून बिपीनदादा कोल्हे यांनी ऑनलाईन पद्धतीने सहभाग नोंदवला.
