

कोपरगाव प्रतिनिधी:-
तत्कालीन राजकीय परिस्थिती सुरुवातीच्या काळात हिंदुत्ववादी रेखाटलेले क्रांतिगुरु लहुजी साळवे हे खऱ्या अर्थाने परिवर्तन वादी विचारांचे होते.त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी लहुजींचा इतिहास मांडताना ते देशप्रेमी असल्या बरोबरच लहुजी साळवे यांचे परिवर्तन वादी विचार समाज बांधवांच्या समोर रेखाटने आवश्यक आहे असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केले
क्रांती गुरू लहुजी साळवे यांच्या 227 व्या जयंती निमित्ताने लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले
सुरुवातीला क्रांती गुरु लहुजी साळवे यांच्या प्रतिमेला जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश धुमाळ व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला
या वेळी बोलताना पोळ पुढे म्हणाले की तत्कालीन इंग्रजी राजवटी विरुद्ध लहुजींनी सशस्त्र क्रांतीकारकांची फौज उभी करून जहाल विचारांचा पाया घातला मात्र त्यामुळे त्यांचा एकाकी इतिहास रेखाटला असून या काळात क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक कार्यात संरक्षण देण्याचे काम काम केले तसेच बहुजनांच्या शिक्षण घेण्यावर बंदी असताना त्यांनी आपली पुतणी मुक्ता साळवे हिला सावित्रीबाई फुले यांच्या शाळेत बसवले त्यामुळेच मुक्ता साळवे “आम्ही धर्म नसलेली माणसे” हा व्यापक निबंध लिहू शकल्या यातून क्रांती गुरू लहुजी साळवे यांचे विचार बहुजनांच्या शिक्षण,संरक्षण व सन्मान मांडणारे होते मात्र दुर्दैवाने त्यांचे चरित्र रेखाटताना इतिहासकार यांनी एकांगी रेखाटलेले मात्र या पुढील काळात सामाजिक कार्यकर्ते यांनी समाज बांधवांच्या समोर लहुजींचा इतिहास मांडताना त्यांच्या परिवर्तन वादी विचारांचा इतिहास मांडावा असे आवाहन केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजल चंदन शिव यांनी केले केले तर यावेळी विद्रोही साहित्यिक व मुस्लिम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते अकबर भाई शेख, लहुजी टायगर सेनेचे शरद त्रिभुवन, सोमनाथ म्हस्के यांनी लहुजींच्या कार्यावर आपले विचार मांडले
यावेळी कार्यक्रमास घटनाकार मैत्री संघाचे नितीन बनसोडे, आर पी आय चे देवराम पगारे भाजप अनुसूचित जाती सेल चे शहर अध्यक्ष शंकर बिऱ्हाडे, विनोद नेरे,आदी मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते.
