न्यु स्टार मोबाईल रिपेअरिंग इन्स्टिट्यूट अँन्ड क्लासेसच्या वतीने मोबाईल रिपेअरींग कोर्स; पहिली बँच यशस्वी संपन्न:- सादिक खान सर…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव शहरातील न्यु स्टार मोबाईल रिपेअरिंग इन्स्टिट्यूट अँन्ड क्लासेसच्या वतीने मोबाईल रिपेअरिंग कोर्स चालु झाला असुन पहिली यशस्वी बँचही संपन्न झाली आहे.कोपरगाव शहरातील व तालुक्यातील तरुण बेरोजगार यांना हा कोर्स संजीवनी ठरत आहे.सध्या मोबाईल प्रत्येक माणसाला अविभाज्य घटक बनला आहे.त्यामुळे मोबाईल दुरूस्ती कोर्सला महत्व आले आहे.यापूर्वी मोबाईल दुरूस्ती कोर्ससाठी नाशिक, नगर, औरगाबादला जावे लागत होते.

परंतु न्यु स्टार मोबाईल रिपेअरिंग इन्स्टिट्यूट अँन्ड क्लासेसच्या वतीने हा कोर्स सुरु केल्या मुळे कोपरगाव तालुक्याच्या तरूणांना रोजगार मिळवून देण्यासाठी सक्षम ठरत आहे.या कोर्स मध्ये बेसिक पासून ते एक्सपर्ट लेव्हलचे प्रशिक्षण अवघ्या ४५ दिवसात दिले जात आहे.त्यामुळे तरूण स्वतःचा व्यवसाय करुन रोजगार मिळवत आहे.सादिक खान,इम्राम खान, मोबिन कानपुरी या तिन शिक्षकांनी उत्तम पद्धतीने शिक्षण दिले आहे.अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या आहे..सादिक खान,इम्राम खान, मोबिन कानपुरी या तिन शिक्षकांचे कोपरगाव तालुक्यात कौतुक होत आहे.

त्यांनी अनेक तरूणांना रोजगार मिळवून दिला आहे.कोपरगाव तालुक्यातील पहिले यशस्वी इन्स्टिट्यूट म्हणून न्यू स्टार मोबाईल रिपेअरिंग इन्स्टिट्यूट पुढे येत आहे.आज पहिल्या प्रशिक्षणार्थीची बँच संपन्न होवुन समारोप कार्यक्रम संपन्न झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *