साईबाबा कॉर्नर ते येवला नाका तालुका हद्य रस्ता दुरुस्त करा:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-
नगर-मनमाड महामार्गावरील कोपरगाव शहरालगत साईबाबा कॉर्नर, येवला नाका तालुका हद्द रस्ता अत्यंत नादुरुस्त झाला असून तो तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी भाजपाचे प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी जागतिक बँक प्रकल्प विभाग आमदनगर चे कार्यकारी अभियंता यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
त्यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, प्रमुख राज्यमार्ग ८ वर कोपरगाव तालुका टोल नाका हद्दीत येणाऱ्या रस्त्यात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत व रस्त्याच्या कडेला घळ्या पडलेले आहेत तसेच दुभाजकास पट्टे मारलेले नाही, झेब्रा क्रॉसिंग पट्ट्या इलेक्ट्रिक केटाय बसवलेले नाही, अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यामुळे प्रवाशांना व नागरिकना जीव गमवावा लागत आहे. रस्त्याला चढ-उतारामुळे चार चाकी वाहनांचे मशीनला धक्का लागून मशीन नादुरुस्त होऊन वाहनधारकांच्या खिशाला झळ बसत आहे, या रस्त्यावर जागतिक कीर्तीचे श्री साईबाबा मंदिर, जंगली महाराज आश्रम, महानुभाव पंथ श्रीकृष्ण मंदिर, जनार्दन स्वामी समाधी मंदिर, जगदंबा माता मंदिर, कोपरगाव बेट गुरु शुक्राचार्य धार्मिक स्थळे आहेत, तेव्हा या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करून या रस्त्याचे मजबुतीकरण दुभाजक झेब्रा क्रॉसिंग संदर्भात तात्काळ दुरुस्ती व्हावी अशी मागणी स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *