स्वसंरक्षणासाठी शिवकालीन खेळ प्रेरणादायी:- कोमल शिंदे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
मैदानी खेळा बरोबरच स्वसंरक्षणासाठी शिवकालीन खेळ प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय खेळासाठी भारतीय संघात गोफण व दांडपट्टा खेळासाठी निवड झालेल्या लहुकन्या कोमल ताई शिंदे यांनी व्यक्त केले
स्पेन येथे खेळल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धे करिता पुणे येथील लहू कन्या कोमल ताई शिंदे यांची निवड झाली त्या बद्दल कोपरगाव येथे लोक स्वराज्य आंदोलन व लहुजी टायगर सेनेच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लहुजी टायगर सेनेचे शरद त्रिभुवन यांनी केले
या वेळी सत्काराला उत्तर देताना कोमल शिंदे म्हणाल्या की सध्या अनेक ठिकाणी महिला भगिनी विविध अन्याय अत्याचाराच्या बळी ठरत आहेत मात्र महिला असो की पुरुष प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे त्यासाठी मैदानी खेळला महत्व दिले पाहिजे असे असले तरी महिलांनी स्व संरक्षण करण्यासाठी शिवकालीन दांडपट्टा गोफण आदी खेळात सहभाग घेतला तर कोणत्याही अन्याय अत्याचाराला सामोरे जावे लागणार नाही
यावेळी विनोद राक्षे, लायन्स मूकबधिर विद्यालयाचे कला शिक्षक रवींद्र कांबळे सर यांना राज्यस्तरीय वामनदादा कर्डक समाजभूषण पुरस्कार मिळाल्या बद्दल तर बलभीम उल्हारे व दिलीप तुपसुंदर रवी शेलार यांचा शिक्षक दिना निमित्ताने सत्कार करण्यात आला यावेळी पुणे येथील कुंडलिक कचाळे,अँड.नितीन पोळ सोमनाथ म्हस्के उल्हारे सर यांनी मनोगत व्यक्त केले
तर कार्यक्रमास जयवंत मरकाळे, शंकर बिऱ्हाडे, अनिल जाधव, प्रवीण शेलार, विजय काकडे, अण्णा साळवे, अर्जुन मरसाळे, अशोक पवार, देविदास पगारे,सोमनाथ अहिरे,प्रमोद आरणे, मोनू म्हस्के,सागर वैरागळ आदी समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *