शिर्डी श्री.साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ जाहीर अध्यक्ष पदी आमदार आशुतोषदादा काळे यांची निवड तर उपाध्यक्षपदी अँड जगदीश सावंत व सदस्य खालीलप्रमाणे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- देशाचे लक्ष लागून असलेल्या शिर्डी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाची घोषणा झाली असुन या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्ष पदावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोपरगावचे युवा आमदार आशुतोष काळे यांची वर्णी लागली आहे

 तर जगदीश सावंत यांची उपाध्यक्ष पदी निवड झाली असून 12 जणांचे विश्वस्त मंडळ गेझेट काढून जाहीर करण्यात आले आहे. अनेक दिवसापासून हा निर्णय प्रलनबीत होता. हा निर्णय जाहीर झाल्या पासून कोपरगाव तालुक्यासह सर्वत्र आमदार काळे यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.

  साई संस्थांनच्या विश्वस्त मंडळात अध्यक्ष आमदार श्री.आशुतोष अशोकराव काळे, उपाध्यक्ष अँड. जगदीश हरिश्चंद्र सावंत, तर सदस्य श्रीमती. अनुराधा गोविंद अदिक, अँड.सुहास जनार्दन आहेर, श्री.अविनाश आप्पासाहेब दंडवते, श्री. सचिन रंगराव गुजर,श्री. राहुल नारायण कनल, श्री.सुरेश गोरक्षनाथ वाबळे, श्री.जयवंतराव पुंडलिकराव जाधव, श्री.महेंद्र गणपतराव शेळके, श्री.एकनाथ भागचंद गोंदकर तसेच शिर्डी नगरपंचायत चे नगराध्यक्ष असे 12 सदस्यांची निवड करण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *