श्री.जनार्दन स्वामी हॉस्पिटल,(SJS) कोकमठाण येथे जगदगुरू संतश्रेष्ठ श्री जनार्दन स्वामी महाराज यांचे धाकटे बंधू श्री दत्तूपाटील उगले यांच्या सूनबाई सौ. ताराबाई उगले यांची बायपास शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- जगदगुरू संतश्रेष्ठ श्री जनार्दन स्वामी (मौ) महाराज यांचे धाकटे बंधू श्री दत्तूपाटील उगले यांच्या सूनबाई सौ. ताराबाई उगले रा. दहेगाव. ता. वैजापूर या हृदय विकाराने आजारी होत्या.. त्यांच्या हृदयात पाच ब्लॉकेजेस होते, त्यामुळे त्यांच्यावर तातडीने बायपास शस्रक्रीया करणे गरजेचे असलेने.. त्यांची हृदयाची बायपास शस्त्रक्रिया श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल, कोकमठाण, कोपरगाव येथे यशस्वी पार पडली असुन सौ. ताराबाई उगले यांची प्रकृती व्यवस्थीत आहे.. बाबाजींच्या कुळातील वंशज असलेल्या सौ. ताराबाई उगले यांच्या अतीकठीण अश्या शस्त्रक्रियेची जबाबदारी श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल व सुप्रसिद्ध CVTS सर्जन डॉ.श्री निरज काळे यांनी यशस्वी रीत्या पेलून बाबाजींच्या कुळातील वंशजांप्रती मोलाचे योगदान दिले आहे.. गेल्या महीन्याभरापासून या रुग्नालयात एंजीओग्राफी, एंजीओप्लास्टी, बायपास सर्जरी सारख्या सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रियांना सुरुवात झाली असुन महीनाभरात अठरा शस्त्रक्रिया विनामूल्य, विनाजोखीम यशस्वीरीत्या पार पडल्या आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *