लक्ष्मीनगरच्या अतिक्रमित शासकीय जागा नियमाकूल करण्याचा प्रश्न माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांच्या पाठपुराव्यानेच मार्गी; दिशाभुल करून श्रेय घेण्याचा कोणी प्रयत्न करू नये:- नगरसेविका हर्षाताई कांबळे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील विविध उपनगरामधील सरकारी जागेवरील अतिक्रमणे नियमाकूल करण्यासाठी तत्कालीन आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी पाठपुरावा केला, प्रायोगिक तत्वावर लक्ष्मीनगर येथील रहिवाशांच्या जागा नियमाकूल करण्यासाठी दि.6 जुलै 2019 रोजी या भागात बैठक घेउन कार्यवाही करण्याच्या संबधित अधिका-यांना सूचना दिल्या, ही वस्तुस्थिती असून हा प्रश्न सौ कोल्हे यांच्यामुळेच मार्गी लागला असुन केवळ दिशाभुल करून श्रेय घेण्याचा कोणी प्रयत्न करू नये, अशी टीका भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका सौ हर्षाताई कांबळे यांनी केली आहे.
सर्वांसाठी घरे 2022 या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याासाठी शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमाकूल करण्याच्या धोरणात सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय क्रमांक प्रआयो-2017/प्र.क्र.348/योजना-10 दिनांक 16 फेब्रुवारी 2018 अन्वये केंद्र व राज्य सरकारने सन 2022 पर्यंत सर्व बेघर कुटूंबांना घर देण्याची महत्वाकांक्षी मोहिम हाती घेतली. त्या अनुशंगाने तत्कालीन आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी कोपरगाव शहरातील विविध उपनगरात असलेल्या अतिक्रमित जागेवरील अतिक्रमणे नियमाकूल करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रायोगिक तत्वावर लक्ष्मीनगर येथील अतिक्रमिणे नियमाकूल करण्यासाठी दि. 6 जुलै 2019 रोजी रहिवाशांबरोबर प्रातांधिकारी, तहसिलदार आणि कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांचेसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सन 2011 पर्यंतची सर्व अतिक्रमण धारक नागरीकांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याने या कामाच्या सर्वेक्षणासाठी असलेल्या प्रकल्प अधिका-याकडून सर्व सोपस्कार पुर्ण करून पुढील कार्यवाही केली. या मध्ये कोपरगाव शहरातील हनुमाननगर,इंदिरानगर,दत्तनगर,महादेवनगर, गोरोबानगर, गजानननगर, लिंबारा मैदान, गांधीनगर, टिळकनगर, संजयनगर, सुभाषनगर, लक्ष्मीनगर, साईनगर, येवला रोड, खडकी, जिजामाता उदयान, टाकळी नाक्यामागील व बेट अशा 20 ठिकाणी असलेल्या 5 हजार 561 अतिक्रमित घरांचा समोवश आहे. यासंदर्भातील जिल्हाधिकारी कार्यालयातील पुढील पाठपुरावा करून लक्ष्मीनगर येथील अतिक्रमण धारकांना त्यांच्या जागा नियमाकूल करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे या कामात माजी आमदार सौ कोल्हे यांचे योगदान महत्वाचे असुन त्यांच्या प्रयत्नामुळेच हे काम मार्गी लागत असून यासंदर्भात नेहमीप्रमाणे जनतेची दिशाभूल करून कोणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, अशी टीका नगरसेविका सौ कांबळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *