“संजीवनी यूवा प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज मानाची दहीहंडी संपन्न..!!”

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले अनेक वर्षांपासून सुरू असलेली संजीवनी युवा प्रतिष्ठानची दहीहंडी परंपरा खंडित होऊ नये यासाठी युवकांच्या आग्रहास्तव संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व ह.भ.प.श्री.गणपतजी महाराज लोहाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत दहीहंडी उत्सव उत्साहात पार पडला..!!

श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपालकाला या सामाजिक संदेश प्रेरित करणाऱ्या उत्सवाचे औचित्य साधत संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने वैद्यकीय मदत म्हणून येथील दोन महिन्यांची चिमुकली कु.वैष्णवी आहिरे,कु.युवराज दौलतराव लटके,कुमारी-भाग्यश्री ज्ञानेश्वर सोनवणे यांना प्रत्येकी ११ हजार रुपयांचा धनादेश देऊन वैद्यकीय मदत करण्यात आली..!!

या प्रसंगी भगवान श्रीकृष्णाचे विविध प्रसंग व दहीहंडी साजरी करण्याची परंपरा,सामाजिक जीवनात एकमेकांना सहकार्य करत सदविचार व सहकार्य यांची दहीहंडी आपण रचावी,आपल्या प्रथा परंपरा या खंडित होऊ नये यावर प्रबोधनपर मार्गदर्शन ह.भ.प.लोहाटे महाराज यांनी केले.तसेच देशात अन्य राज्यात मंदिरे सुरू आहेत मात्र आपल्या राज्यात भक्तीभावाची ऊर्जा देणारी मंदिरे खुली नाहीत हे शल्य आहे.कोरोनाच्या लढाईत अध्यात्मिक ऊर्जा देखील महत्वाची आहे हे विसरुन चालणार नाही असे ह.भ.प.लोहाटे महाराज यांनी मार्गदर्शन केले.. !!

श्रीकृष्णांची जीवनाला अमूल्य अशी शिकवण आहे.दहीहंडी ही समाजाला व खास करून युवकांना दिशा देणारी आहे.संजीवनी युवा प्रतिष्ठान हे सामाजिक कार्याची दहीहंडी रचणारे आदर्श युवा प्रतिष्ठान म्हणून महाराष्ट्रात कोपरगावचे नाव अभिमानाने घेऊन जाण्याचे काम विविध कटू-गोड प्रसंगात मदत करून सातत्याने केले जाते आहे.संजीवनी युवा प्रतिष्ठान हे युवकांच्या दिशादर्शक भवितव्यासाठी कटिबद्ध असून या पुढील काळात युवकांना भरघोस पाठबळ आपण देणार आहे व लवकरात लवकर कोरोना हद्दपार व्हावा व पुढील वर्षी आपण मोठ्या भव्य प्रमाणात दहीहंडी साजरी करण्याचे निरोगी वातावरण निर्माण व्हावे अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करतो असे प्रतिपादन युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी मनोगत व्यक्त करतांना केले..!!

या प्रसंगी कोरोनाचे नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे शहाराध्यक्ष,आजी-माजी पदाधिकारी,आजी-माजी नगरसेवक,प्रतिष्ठित नागरिक,व्यापारी बांधव,संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवासेवक उपस्थित होते..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *