
कोपरगाव प्रतिनिधी:-
नाटेगाव येथे कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या गल्लीमधे रॅपीड अॅंटीजन टेस्ट कॅम्प घेण्यात आला.
कोरोना रूग्ण लवकरात लवकर शोधुन कोरोना आजाराचा प्रसार रोखण्यासाठी तालुका टास्क फोर्स कोरोना नियंत्रण समिती ने पाॅझिटिव्ह रुग्णाच्या भोवतालच्या घरांमधे कोरोना टेस्ट घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाटेगाव येथे ८० जणांच्या टेस्ट घेण्यात आल्या. सदर ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ संतोष विधाते उपस्थित होते. या कामी सरपंच विकास मोरे, उपसरपंच ताराचंद मोरे यांनी नागरिकांना टेस्ट करण्यास आणन्यासाठी मोलाची कामगिरी केली आहे. सदर टेस्ट एम पी डब्ल्यू श्री. जवादे आणि ए एन एम श्रीमती वाघ आणि आशा स्वयंसेविका यांनी केल्या.
