
कोपरगांव प्रतिनिधी:-
जगभरात थैमान घालणा-या कोरोना विषाणू संसर्गाविरूध्द प्रत्येक भारतीय धैर्याने
लढा देत आहे. या कठिण प्रसंगी येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमधील सेवा
देणा-या सर्व कर्मचा-यांना संस्थेतर्फे विमा सुरक्षा कवच देण्यात आले आहे.
बाजार समितीचे सभापती श्री.संभाजीराव शंकरराव पा.रक्ताटे, उपसभापती
श्री.राजेंद्र शंकरराव पा.निकोले, सचिव श्री.नानासाहेब सोपान रणशुर व सर्व
संचालक मंडळ यांच्या पुढाकाराने प्रत्येक कर्मचा-यांचा ५ लाखांचा विमा काढण्यात
आला आहे. बाजार समितीमधील २० कर्मचा-यांना या विम्याचा लाभ मिळणार
आहे.
कोपरगांव बाजार समितीमध्ये मोठया प्रमाणात शेतमालाची खरेदी-विक्री होते.
संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द असलेल्या कोपरगांव बाजार समितीमध्ये शेतक-यांना
विविध सुविधा दिल्या जातात. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असतांना सुध्दा बाजार
समितीमधील कर्मचारी सेवा देत असतात.
अशावेळी कर्मचारी व त्याच्या कुटुंबियांची भविष्याची काळजी घेण्यासाठी
बाजार समितीचे सभापती श्री.संभाजीराव शंकरराव पा.रक्ताटे, उपसभापती श्री.राजेंद्र
शंकरराव पा.निकोले, सचिव श्री.नानासाहेब सोपान रणशुर व सर्व संचालक मंडळ
यांनी पुढाकार घेऊन प्रत्येक कर्मचा-यांचा ५ लाखांचा सुरक्षा विमा काढला आहे. या
निर्णयामुळे कर्मचा-यांनी समाधान व्यक्त केले आहे.
