कोपरगाव तहसिल कार्यालय येथे झालेल्या वाहनांच्या लिलावामध्ये शासनाला ४७ लाख रुपये महसूल प्राप्त झाला:- तहसिलदार योगेश चंद्रे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
दिनांक ३१/०८/२०२१ रोजी कोपरगाव तालुक्यातील अवैध गौण खनिज वाहतूक करताना पकडलेली आणि सर्व प्रक्रीया राबवूनही शासनाला दंड न भरलेल्या वाहनांचा लिलाव तहसिल कार्यालय कोपरगाव येथे घेण्यात आला आहे. सदर लिलावामध्ये एकूण ४५ वाहने लिलावासाठी ठेवण्यात आली असून त्याची एकूण रक्कम ७५ लाख रुपये आहे. आजच्या लिलाव प्रक्रियेमध्ये एकूण २६ वाहने हे लिलाव प्रक्रियेमध्ये गेलेले असून त्यातून शासनाला ४७ लाख एवढा महसूल प्राप्त झाला आहे. वाहनाची सावित्सर माहिती खालीलप्रमाणे आहे,
एकूण वाहने ४५
वाहनाचा प्रकार ट्रक्टर २७ ,टाटा झेनोन ७,डम्पर ५ जेसीबी ५,ट्रक १
यापैकी लिलावात गेलेली वाहने
वाहनाचा प्रकार ट्रक्टर १९ ,टाटा झेनोन ३,डम्पर ३, जेसीबी ०,ट्रक १
अशाप्रकारे एकूण ४५ वाहनापैकी २६ वाहनांचा लिलाव झाला असून त्यातून शासनाला ४७ लाख रुपये एवढा महसूल मिळाला आहे. उर्वरित १९ वाहने जे आज लिलावात गेलेली नाही त्यांचा लिलाव परत १५ दिवसांनी लावणार असून त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनि सहभाग घ्यावा.
योगेश चंद्रे तहसिलदार कोपरगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *