

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):- नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांच्या संकल्पनेतून नाशिक शहर व परिसरात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेल्या ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ मोहिम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन कडून ज्या कुटुंबातील सदस्याचे अपघातात निधन झाले आहे त्यांच्या कुटुंबियांना हेल्मेट वाटप करण्यात आले.



यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त मधुकर गावित, आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख, शेल पेट्रोलियम आग्रारोड आडगावचे संचालक मिलिंद महाजन, नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, वरिष्ठ उपाध्यक्ष पीएम सैनी, महेंद्र सिंग राजपूत, दलजीत सिंग मेहता, दीपक ढिकले, तेजपाल सोढा, दीपक पांडे, राजेश शर्मा, कैलास शिंदे, अमोल चव्हाण, आनंद राजपूत, पंकज अग्रवाल, धिरा भाई, मुकेश कुमार करन, विश्वास तांबे, रामभाऊ सुर्यवंशी, अशोक पवार, लहामगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने चालकांना मिठाईचे वाटप करण्यात आले. तसेच ज्या कुटुंबातील प्रमुख मोटरसायकल अपघातात मृत झालेले आहे अशा परिवारातील सदस्यांना हेल्मेट वाटप करत जनजागृती करण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त मधुकर गावित, आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांनी नाशिक पोलिसांच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या मोहिमेत सहभाग घेऊन काम करत असल्याबद्दल नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना अध्यक्ष राजेंद्र फड म्हणाले की, नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने नेहमीच सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन योग्य ती मदत करण्याचा प्रयत्न करते. नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांच्या संकल्पनेतून नाशिक शहर व परिसरात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेल्या ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ मोहिम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेत देखील सर्व सदस्य सक्रियपणे सहभाग घेऊन जनजागृती करण्यास प्राधान्य देतील असे त्यांनी यावेळी सांगितले.
