उत्राणे ग्रामपंचायत येथे शासकीय कागदपत्रे तयार करून देण्याचे शिबीर संपन्न झाले…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- (सटाणा/नामपूर) :- उत्राणे ग्रामपंचायतचे कार्य कौतुकास्पद असून समाजातील शेवटच्या घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेले विविध कार्यक्रम नक्कीच आदर्शवत असल्याचे प्रतिपादन माजी आमदार संजय चव्हाण यांनी केले आहे.

पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत उत्राणे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदीप आहिरे यांच्या संयुक्त विद्यमाने उत्राणे येथे शासकीय कागदपत्रे काढून देण्याचे शिबीर संपन्न झाले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार हे होते. उत्राणे या गावाच्या पंचक्रोशीतील नागरिकांसाठी शासकीय कागदपत्रे तयार करून देण्याचे शिबीर घेऊन खऱ्या अर्थाने ना.छगन भुजबळ यांचा वाढदिवस साजरा झाला असल्याचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
शेवटच्या घटकातील लोकांपर्यंत पोहचून त्यांच्या अडचणी दूर करून शासकीय कागदपत्रे तयार करून देण्यासाठी प्रयत्न करणारे संदीप अहिरे यांचे कार्य अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी यावेळी बोलतांना केले.
नवीन रेशन कार्ड काढून देणे, जुन्या रेशन कार्ड मधील नावे कमी-जास्त करणे, रेशनकार्ड वरील पत्ता बदलणे, हरवलेले रेशन कार्ड नव्याने काढून देणे व पेन्शन योजनेसाठी लागणारी कागदपत्रे या शिबिरात काढून देण्यात आली. या शिबिराची सोशल मिडीयाच्या माध्यमातून मोठी प्रसिद्धी करण्यात आली होती. तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दवंडी देखील देण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या संख्येने जनतेने या शिबिरात सहभाग घेतला. सहभागी झालेल्या सर्वांची कागदपत्रे अद्यावत करून देणार असल्याची माहिती या शिबिराचे आयोजक व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदीप अहिरे यांनी दिली आहे.

      यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार, माजी आमदार संजय चव्हाण, उत्राणे ग्रामपंचायतीचे सरपंच केदा पगार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस संदीप आहिरे, उत्राणे उपसरपंच पुंजाराम पगार, सटाणा बाजार समितीचे माजी संचालक अनिल चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा रेखा शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष सम्राट काकडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यार्थी तालुकाध्यक्ष सुयोग अहिरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस सहकार सेलचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांगडिया, इतर मागासवर्गीय सेलचे जिल्हा सरचिटणीस उजेंद्र आहिरे, नामपूर जिल्हा परिषद गट प्रमुख गायत्री कापडणीस, मनीषा अहिरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका सरचिटणीस शरद पगार, विशाल मांडवडे,  उत्राणे ग्रामपंचायतीचे सदस्य कोमल पगार, अनुसया पगार, झेलाबाई बागुल, मधुकर पगार, नितीन पगार, कारभारी पगार, शालेय समितीचे अध्यक्ष आनंदराव पगार, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब पगार, ग्रामसमितीचे अध्यक्ष जगदीश पगार, डोंगरअण्णा पगार, प्रभाकरदादा पगार, संदीप कापडणीस, प्रवीण पगार, प्रकाश पगार, लोटन गरुड, दिनकर पगार, केवळ पगार, उत्तम भामरे, संजय पगार, शेखर पगार, विरेंद्र पगार, राकेश पगार, शुभम पगार, निखील खैरनार, पियुष सोनावणे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळी:- उत्राणे येथे आयोजित शासकीय कागदपत्रे काढून देण्याच्या शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार. समवेत माजी आमदार संजय चव्हाण, शैलेश सूर्यवंशी, संदीप आहिरे, सरपंच केदा पगार, पुंजाराम पगार, सम्राट काकडे, रेखा शिंदे, सुयोग अहिरे, शरद पगार आदी दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *