राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाच्या अहमदनगर जिल्हा प्रवक्तेपदी “मा.श्री किरणभाऊ मदने, संगमनेर” यांची एकमताने निवड:- मनोजभाऊ वाघ…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी;-
कोपरगाव येथे समाज पदाधिकारी मिटिंगमध्ये राष्ट्रीय नाभिक महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष मा.श्री किरणभाऊ बिडवे व नाभिक एकता महासंघाचे जिल्हाध्यक्ष मा.श्री मनोजभाऊ वाघ यांच्या उपस्थितीत संगमनेर येथील मा.श्री किरणभाऊ मदने यांची अहमदनगर जिल्हा प्रवक्तेपदी एकमताने निवड करण्यात आली. श्री किरण मदने हे समाजातील विविध विषयावर अभ्यास करून तो विषय प्रसार माध्यमातून योग्य प्रकारे लेखन करुन समाज बांधवांना जागृत करतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची या पदावर निवड करण्यात आली. यावेळी जेष्ठ नेते व जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री भाऊसाहेब बिडवे, कोपरगाव तालुका अध्यक्ष मा.श्री दिलीपशेठ जाधव, संगमनेर तालुका अध्यक्ष मा.श्री किशोरभाऊ बिडवे सर, जिल्हा कार्याध्यक्ष मा.श्री अनिलभाऊ बिडे, संगमनेर तालुका सलून असोसिएशन तालुकाध्यक्ष मा.श्री बाळासाहेबजी वाघ, मा.श्री सुनिलभाऊ गायकवाड, मा.श्री आनंदभाऊ बिडवे, मा.श्री संजयभाऊ सोनवणे, मा.श्री संजयभाऊ राऊत, कोपरगाव शहर उपाध्यक्ष मा.श्री सोमनाथ व्यवहारे, मा‌‌.श्री श्यामकाका आहेर, कोपरगाव तालुका उपाध्यक्ष मा.श्री दत्तात्रयभाऊ आहेर, राहता सलून असोसिएशनचे उपाध्यक्ष मा.श्री संदीपभाऊ अहिरे, सलून असोसिएशन कोपरगाव तालुका अध्यक्ष मा.श्री मनोजभाऊ बिडवे, मा.श्री दिनेशभाऊ संत, अकोला तालुका कार्याध्यक्ष मा.श्री अमोलभाऊ कोल्हाळ, मा.श्री गणेशभाऊ बिडवे मा.श्री रवींद्रजी भराडे आदी समाज बांधव समाज उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *