दिव्यांग असल्याचा न्यूनगंड न बाळगता आंतरिक शक्ती ओळखा:-आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर:-
निसर्गाने प्रत्येक मानवाला सर्वच गुण बहाल केलेले नसतात. प्रत्येकामध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीची उणीव हि नक्की असते. त्यामुळे आपण दिव्यांग असल्याचा न्यूनगंड न बाळगता आपण आपली आंतरिक शक्ती ओळखा असा मौलिक सल्ला आमदार आशुतोष काळे यांनी दिव्यांग बंधू-भगिनींना दिला.

कोपरगाव येथे दिव्यांग मतदार संघातील बंधू-भगिनींना वैश्विक कार्डचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, कोणत्याही एका गोष्टीची उणीव आपल्याला यश मिळविण्यापासून दूर नेऊ शकत नाही. एक बाजू कमकुवत जरी असली तरी त्याची भरपाई करण्यासाठी निसर्गाने एक गुण जास्त बहाल केलेला असतो याची खात्री बाळगा. मनाचा दृढ निश्चय करून काम करायचे ठरवले तर दिव्यांग बांधव सर्वसामान्य व्यक्तीपेक्षाही उत्कृष्ट कामगिरी निश्चितपणे करू शकतात. त्यामुळे दिव्यांग असल्याचे मनातून काढून टाका जे काम हाती घेतले आहे त्या कामावर विलक्षण निष्ठा ठेवा तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवनात कोणत्या अडचणी येतात याची मला जाणीव असून या अडचणी सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगत कोपरगाव मध्ये दिव्यांग भवन बांधण्याचा मानस आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.              

       यावेळी पंचायत समिती सभापती सौ.पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक बाळासाहेब बारहाते, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ.सोनाली साबळे, पंचायत समिती सदस्य श्रावण आसने, मधुकर टेके, अनिल कदम, रोहिदास होन, नगरसेवक मंदार पहाडे, हाजीमेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, लायन्स मूकबधिर विद्यालयाचे संचालक संदीप रोहमारे, फकीर कुरेशी, रमेश गवळी, अपंग प्रहार संघटनेचे परमेश्वर कराळे,नारायण गुरसळ, भास्करराव डुकरे,पप्पू वीर, पंचायत समितीचे पंडितराव वाघिरे आदी मान्यवर उपस्थित होते.


फोटो ओळ - दिव्यांग बांधवांना वैश्विक कार्डचे वितरण प्रसंगी आमदार आशुतोष काळे,दिव्यांग बांधव व मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *