विद्यार्थांकरिता शिक्षकांचे दातृत्त्व, ऑनलाइन शिक्षणासाठी शिक्षकांनी शाळेकरिता 43 इंची अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही खरेदी केला…!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
नगरपालिका शाळा क्र.५, कोपरगाव ही बेट भागात असलेली प्राथमिक शाळा आहे. शाळेची स्थापना 17 डिसेंबर 1917 ची असून शाळेत गोरगरीब पालकांची मुले शिक्षण घेतात. काळानुरूप शिक्षणात बदल होत गेले. अनेक इंग्रजी, सेमी व सी. बी. एस. ई. माध्यमाच्या शाळा सुरु झाल्या, तशी मराठी शाळेची पटसंख्या कमी होत गेली. अश्या बदलत्या शिक्षण पद्धतीत सरकारी मराठी माध्यमाच्या शाळांना व शिक्षकांना आपल्यात शैक्षणिक तंत्रज्ञानात व भौतिक सुविधा यात विकास करावा लागला.गोरगरीब मुलांनाही उच्च प्रतीचे नावीन्यपूर्ण व जगातल्या विविध शैक्षणिक अनुभूती प्राप्त व्हावी याकरिता सर्व शिक्षक आधुनिक तांत्रिक प्रशिक्षण घेऊन विविध साधनाद्वारे विद्यार्थ्यांना शिकवत असतात. याचाच एक भाग म्हणून शाळेतील ४ शिक्षकांनी शाळेकरिता 43 इंची अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही खरेदी केला, ज्याद्वारे ऑनलाईन शिक्षण देता येईल. इतर माध्यमाच्या शाळाबरोबरीने शैक्षणिक साधने उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने दा्तृत्व दाखवत शिक्षकांनी स्वखर्चाने टीव्ही खरेदी केला आहे. हे शिक्षक आहेत विलास माळी, सुनिल रहाणे, नसरीन इनामदार व अमोल कडू. प्रजासत्ताक दिनी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीम. कावेरी शिंदे, व सदस्य भाऊसाहेब शिंदे, डी. एन. आव्हाड, सुवर्णा मतकर,अश्विनी रक्ताटे, रेखा परदेशी, गोविंद गोधडे, इ. शुभहस्ते टीव्ही शाळेला सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी लीलावती जमधडे,आशालता शिंदे, मोरे ताई, काळे ताई, आव्हाड ताई,गोपाळ कोळी, सनी गायकर, संतोष मतकर, शोभा साळुंके, प्रकाश साळुंके, अर्चना वाघमारे, वर्षा वाघमारे, ग्रामस्थ व माजी विद्यार्थी उपस्थित होते.गिते ताईंनी शाळेविषयी मनोगत व्यक्त केले.मुख्याधिकारी शांताराम गोसावी व प्रशासनाधिकारी मोहनीश तुंबारे यांनी अभिनंदन केले.
अनुप कातकडे यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले. विदयार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून शिक्षकांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *