आ.आशुतोष काळेंच्या कामावर तरुणाई प्रभावित; घारीच्या तीस कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश..!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम असे नेतृत्व आमदार आशुतोष काळे यांच्या रूपाने लाभले असून अल्पावधीतच मतदार संघातील नागरिकांची कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेणारा आमदार अशी त्यांची प्रतिमा संपूर्ण मतदार संघात तयार झाली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होवून कोपरगाव तालुक्यातील घारी येथील विरोधी पक्षाचे लक्ष्मण पवार व ज्ञानेश्वर पवार यांच्यासह तीस कार्यकर्त्यांनी घारी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण प्रसंगी आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. सर्व कार्यकर्त्यांचे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी स्वागत केले.

                     घारी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आ. आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते पार पडले. यामध्ये घारी ते हिंगणवेढे रस्ता खडीकरण करणे, ग्रामपंचायत कार्यालय ते दळवी घर रस्ता खडीकरण करणे, गावांतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे, धर्मा जाधव घर रस्ता काँक्रिटीकरण करणे, हिंगणवेढे जिल्हा परिषद शाळेस तार कंपाउंड करणे व गावठाणवरील दलित वस्ती रस्ता काँक्रिटीकरण करणे आदी कामांचे भूमीपूजन तसेच आर.ओ. प्लॅन्ट शेड उभारणी व पाईपलाईन करणे, जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती करणे, हिंगणवेढे दलित वस्ती रस्ता काँक्रीटीकरण करणे व हिंगणवेढे समाजमंदिर दुरुस्ती करणे अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले.

           यावेळी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, कोपरगाव विधानसभा मतदार संघात आमदार आशुतोष काळे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत रस्ते, वीज, पाणी आदि महत्वाचे प्रश्न मार्गी लावून विविध विकासकामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे. जीवघेण्या कोरोना संकटात एकही दिवस घरात न बसता बाधित रुग्णांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देवून केलेल्या उपाय योजनांमुळे कोपरगाव तालुक्यात कोरोना नियंत्रणात आहे. ज्या कुटुंबातील सदस्यांवर कोरोनाचे संकट ओढावले त्यांना आ. आशुतोष काळे यांनी केलेल्या उपाय योजनांची जाणीव आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये खर्च येत असतांना आमदार आशुतोष काळे यांनी तातडीने केलेल्या उपाय योजनांमुळे सर्वसामान्य कुटुंबातील बाधित रुग्णांचा मोठा खर्च वाचला आहे. निस्वार्थी लोकप्रतिनिधी कसा असावा याचे आमदार आशुतोष काळे आदर्श उदाहरण असून आम्ही त्यांच्या कार्याने प्रभावित होवून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.

             यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक आनंदराव चव्हाण, पंचायत समिती सदस्य सौ.अनुसयाताई होन, राहुल रोहमारे, रोहिदास होन, केशवराव जावळे, देवेन रोहमारे, सुधाकर होन, शिवाजी जाधव, किरण होन, संतोष वाके, सचिन होन, सरपंच रामदास जाधव, उपसरपंच ठकुबाई काटकर, किसन काटकर, पमाजी पवार, नंदकिशोर औताडे, राजेंद्र औताडे, दादाभाई पठाण, देविदास पवार, रावसाहेब पवार, बाळासाहेब जाधव, भानुदास होन, सूर्यभान आहेर, भाऊसाहेब पवार, विश्वनाथ जाधव, बाळासाहेब पवार, परसराम जाधव, चंद्रकांत पवार, शांतीलाल होन, राजेंद्र पवार, साहेबराव पवार, संजय पवार, शिवाजीराव बर्डे, संदीप पवार, विजय पवार, विलास चव्हाण, चांदभाई पठाण, दादाभाई पठाण, योगेश पवार, सुनील पवार, रंगनाथ पवार, संदीप पवार, परमानंद होन, नारायण पवार, सुनील बढे, अनिल पवार, भाऊसाहेब खरात, शरद पवार, संपत खरात, अविनाश पवार, किरण पवार, माधवराव गायकवाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.



फोटो ओळ- घारी येथे विरोधी पक्षाच्या तीस कार्यकर्त्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *