श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात पत्रकार दिन उत्साहाने साजरा..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात पत्रकार दिन उत्साहाने साजरा
कोपरगांवच्या विकासात पत्रकाराचे मोलाचे योगदान आहे.तसेच पत्रकारीतेत परिवर्तन घडविण्याची ताकद आहे. असे प्रतिपादन कोपरगांव एज्यु.सोसायटीचे अध्यक्ष व प्रसिध्द उद्योजक कैलास ठोळे यांनी केले.सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांनी देखिल देशाची लोकशाही टीकविण्यासाठी पत्रकाराची भुमिका खुप महत्वाची आहेअसे त्यांनी स्पष्ट केले.
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात ६जानेवारी पत्रकार दिना निमित्त शहरातील पत्रकारांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री.कैलास ठोळे हे होते.या कार्यक्रमात प्रेस क्लबचे उपाध्यक्ष जेष्ठ पत्रकार श्री.राजेंद्र सालकर यांचे हस्ते गोकुळचंदजी ठोळे यांच्या पुतळ्यांस पुष्पहार घालण्यात आला.
प्रारंभी दर्पणकार बाळशात्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत जेष्ठ शिक्षक श्री.अनिल अमृतकर यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी केले.कोपरगांव एज्युकेशन सोसायटी सचिव दीलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,डाॕ.अमोल अजमेरे आदीच्या हस्ते सर्व पत्रकारांना भेटवस्तु व गुलाबपुष्प देवुन गौरव करण्यात आला.
या प्रसंगी प्रेस क्लबचे उपाध्यक्ष श्री.राजेंद्र सालकर, कोपरगांव पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री.साहेबराव दवंगे,दै.लोकप्रभातचे श्री.सोमनाथ सोनपसारे यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.मिना पाटणी, दै.पुढारी व दै.लोकसत्ताचे महेश जोशी,दिव्य मराठीचे संजय देशपांडे,दै.सकाळचे मनोज जोशी,लोकमंथनचे विजय कापसे,दै.प्रभातचे शंकर दुपारगुडे,पत्रकार संघाचे उपाध्यक्ष लक्ष्मण वावरे,मनिष जाधव,सिध्दार्थ मेहेरखांब,बिपिन गायकवाड,योगेश डोखे,,हाफीज शेख,अनिल दीक्षित,संतोष जाधव,शैलेश शिंदे,शाम गवंडी,संजय लाड,रविंद्र जगताप,संजय भारती,विनोद जवरे,श्री.मधुकर वक्ते,गणेश दाणे,अमोल गायकवाड,सौ.संगिता रासकर आदी मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस.डी.गोरे यांनी तर आभार विदयालयाचे पर्यवेक्षक श्री.रमेश गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमाला श्री.डी.व्ही.तुपसैंदर ,श्री.ए.बी.अमृतकर ,बी.बी.कुळधरण,अनिल काले,ए.जे.कोताडे,डी.पी.कुडके,बी.सी. उल्हारे,योगेश गवळे,आदि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद सोशल डीस्टसिंग पाळुन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *