कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- सांगली सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य रोगराई परिस्थितीत नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी कोपरगाव येथील अश्वमेध मेडिकेअर प्रा.लि.च्या वतीने प्रोटेक्ट आणि कफेक्स हि औषधे घेऊन जाणाऱ्या वाहनाला आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.
यावेळी आमदार आशुतोष काळे म्हणाले की, राज्यातील सांगली सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या महापुराच्या नैसर्गिक आपत्तीमुळे या जिल्ह्यांना मोठा फटका बसून तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष नेहमीच संकट काळात नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. त्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी दिले आहे. समाजातील सर्वच दानशूर व्यक्तींनी अशा संकटाच्या समयी मदतीला धावून जाणे हि खरी माणुसकी असून सामाजिक बांधिलकी जोपासतांना अश्वमेध मेडिकेअर प्रा.लि. कंपनीने महापुरानंतर निर्माण होणाऱ्या साथीचे आजार आजार सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी आदी आजारांपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी दिलेला औषध पुरवठा कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अश्वमेध मेडिकेअर प्रा.लि. डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, डॉ.चंद्रशेखर आव्हाड, नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, सुनील शिलेदार, मेहमूद सय्यद, राजेंद्र वाघचौरे, दिनकर खरे, रमेश गवळी, फकीर कुरेशी, प्रशांत वाबळे, वाल्मिक लहिरे, राहुल देवळालीकर, इम्तियाज अत्तार, प्रकाश दुशिंग, चंद्रशेखर म्हस्के, रावसाहेब साठे, जावेद शेख, गणेश घाटे, कैलास मंजुळे, शुभम शिंदे, जाफर कुरेशी, ताजू बागवान, रोहिदास जानराव, सत्यनारायण मनगर, विकास गायकवाड, तुषार आव्हाड, किरण जोर्वेकर, निलेश साळवे आदी उपस्थित होते.

फोटो ओळ- पूरग्रस्तांसाठी औषध घेऊन जाणाऱ्या वाहनाला आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.
