कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- मोठी लोकसंख्या व अनेक वाड्यावस्त्या असलेल्या कोकमठाण गावाच्या पाणीपुरवठा योजनेच्या तलावात आवर्तनावेळी गोदावरी कालव्यातून पाणी उचलण्याची मोठी अडचण आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून कायमची मार्गी लागली असून नुकतेच या योजनेचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे.
कोकमठाणच्या पाणी योजनेच्या नवीन तळ्याला जोडणाऱ्या पाईपलाईनचे काम अपूर्ण असल्यामुळे आवर्तन काळात कालव्यातून या तळ्यात पाणी घेण्यासाठी अडचणी येत होत्या. त्याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्यातून तळ्यात पाणी घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर होऊन पाईपलाईन व चेंबरचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे यापूर्वी येत असलेल्या अडचणी कायमस्वरूपी संपुष्टात आल्या आहेत. या योजनेचे लोकार्पण करून आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते या नवीन तळ्यात पाणी सोडण्यात आले. याप्रसंगी बोलतांना ते म्हणाले की, पाणीपुरवठा योजना सुरु होण्यापूर्वी अपेक्षित असलेले नळजोड योजना सुरू झाल्यानंतर जोडले जात नाही तसेच सर्वच नळजोडधारक पाणीपट्टी देखील वेळेवर भरीत नाही त्यामुळे पाणीपुरवठा योजना चालवितांना ग्रामपंचायतीना तारेवरची कसरत करावी लागते व योजनेची दुरुस्ती करतांना देखील अनेक आर्थिक समस्या निर्माण होतात. त्यामुळे पाणीयोजना सुरु झाल्यानंतर सर्वच वाडीवस्तीवरील नागरिकांना या पाणी योजनेचा लाभ देऊन ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी वसुलीची काळजी घ्यावी. या योजनेचे जे काही कामे अपूर्ण आहेत ती कामे तातडीने पूर्ण करून त्यानंतर हि योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करावी अशा सूचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. कोकमठाण व परिसरातील रस्त्यांचा अनुशेष भरून काढण्यासाठी मी कटिबद्ध आहे. अनेक रस्त्यांची कामे केली आहेत व यापुढे देखील उर्वरित रस्त्यांसाठी निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सभापती सौ.पोर्णिमा जगधने, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, रोहिदास होन, ग्रामपंचायत सदस्य संजय दंडवते, मच्छिंद्र देशमुख, पंकज लोंढे, जॉनी धीवर, अविनाश निकम, बाबासाहेब पवार, मोहनराव गिरमे, सोपानराव काशीद, महेश लोंढे, संतोष लोंढे, ज्ञानेश्वर रक्ताटे, जालिंदर हाडोळे, संजय थोरात, आबा रक्ताटे, गोरख लोहकणे, सुनील लोहकणे, अनंत रक्ताटे,अल्लाउद्दीन सय्यद, सुनील लोंढे, सुनील साळुंके, जीवन प्राधिकरणचे उपअभियंता शेटे, डे.अभियंता महेश गायकवाड, शाखा अभियंता पी.ए.कदम, सु.दा.हरदास, कोमोदकर, पोळ, उपअभियंता पाटील, श्रेयस जाधव, हर्षद बुचुडे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी केले तर सूत्रसंचालन जालिंदर हाडोळे यांनी केले तर आभार ग्रामसेवक डी.बी. गायकवाड यांनी मानले यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.


फोटो ओळ:- कोकमठाणच्या पाणीपुरवठा योजनेच्या लोकार्पणप्रसंगी नवीन तळ्यामध्ये पाणी सोडतांना आमदार आशुतोष काळे.
