पुणतांबे प्रतिनिधी:-
प्रधान मंत्री गरीब कल्यान अन्न योजनेतुन स्वस्त धान्य दुकानातुन मोफत गहु. तांदुळ. चे वाटप सुरु आहे. हे धान्य घेण्यासाठी शिर्डी विधान सभा सदस्य राधाकृष्ण विखे. यांनी लाभार्थींना पिशव्याचे मोफत वाटप सुरु केले आहे. या पिशव्यांनवर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी. व स्वताहाचे छायाचित्र छापुन भारतीय जनतापक्षाशी असलेली पकड घट्ट केली आहे.
पुणतांबे- रस्तापुर चांगदेवनगर. येथील स्वस्त धान्य दुकानात या पिशव्यांचा वाटप शुभारंभ सरपंच डाँ धनंजय धनवटे. ऊपसरपंच योगेश घाटकर. यांच्या हस्ते झाला. धान्य घेण्यासाठी मोफत पिशव्या मिळत असल्याने लाभार्थी वर्गात आनंदाचे वातावरन पहावयास मिळत आहे.
भारत स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सवाचे निमीत्त साधुन हा ऊपक्रम राबविला जात असल्याचे स्वस्त धान्य दुकानदार गणेश एलम यांनी सांगीतले. गोरगरिबांना मोफत धान्य घरी नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. या योजनेतुन पिशव्या मिळाल्याने सुमारे तिन हजार कुपनधारकांची मोठी सोय झाली आहे. पिशव्या वाटप कार्यक्रमाला बाळासाहेब भोरकडे. विजय धनवटे. राजेंद्र थोरात. भाऊसाहेब केरे. आदी मान्यवर हजर होते.

फोटो ओळी:-
राधाकृष्ण विखे. यांच्या संकल्पनेतुन प्रधानमंत्री योजनेतुन मिळनारे मोफत धान्य घेण्यासाठी मोफत पिशव्याचे वाटप करतांना सरपंच डाँ धनंजय धनवटे. गणेश एलम. आदी
