हॉस्पिटलओम अॅप आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजावेल:-आ.आशुतोष काळे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर:- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना उपचाराच्या दृष्टीने अनेक गोष्टींची माहिती मिळविण्यासाठी विविध हॉस्पिटलशी संपर्क करावा लागत होता. एकीकडे मोठ्या प्रमाणात वाढलेले रुग्ण त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरचा वाढलेला ताण अशा परिस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. कोरोना बाधित रुग्णांना बाधा झाल्यांनतर योग्य मार्गदर्शन, सुविधा व औषधोपचार मिळाल्यास तो रुग्ण निश्चितपणे बरा होतो. त्यासाठी वेळेत योग्य माहिती उपलब्ध असणे गरजेचे असून अशा प्रकारच्या जीवघेण्या संकटात आरोग्यविषयक अत्यंत सूक्ष्म माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार असून भविष्यात हॉस्पिटल ओम अॅप महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास आ. आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.
कोपरगाव मध्ये प्रथमच एमएच ३५७ (MH 357) या कंपनीची स्थापना करून कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना आरोग्यविषयक सोयी-सुविधांची उपलब्धता या विषयी सखोल माहिती देणाऱ्या हॉस्पिटलओम या अॅपचा शुभारंभ नुकताच आमदार आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. या अॅपच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यातील सर्व डॉक्टर्स व हॉस्पिटल्सविषयी सर्व माहिती नागरिकांना घरबसल्या मिळणार आहे. अॅपचे निर्माते प्रीतमजी महावीर संघवी यांनी महाराष्ट्रातील सर्व ३५७ तालुक्यांसाठी हे अॅप सुरू करण्याचा संकल्प केला असून त्यांच्या या कामासाठी आमदार आशुतोष काळे यांनी त्यांना मतदार संघातील जनतेच्या वतीने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

         याप्रसंगी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, डॉ. भरत संघवी, डॉ. विजय संघवी, डॉ. कृष्णा फुलसुंदर, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, डॉ. राजेंद्र चीने, डॉ. योगेश कोठारी, डॉ. मयूर जोर्वेकर, डॉ. मयूर तिरमखे, डॉ. आतिष काळे, डॉ. कुणाल घायतडकर, डॉ. सुनील लोढा, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे, फकीरमामु कुरेशी, दिनकर खरे, राहुल देवळालीकर, जावेद शेख, अॅड. मनोज कडू, गणेश लकारे, वाल्मिक लहिरे, धनंजय कहार, संदीप देवळालीकर, इम्तियाज अत्तार, जुनेद शेख, संतोष बारसे, नितीन जोरी, अमोल देवकर, विलास नरोडे, गोरख कानडे, प्रताप गोसावी, महेश उदावंत, योगेश वाणी, रवींद्र छाजेड, जितेंद्र छाजेड आदी उपस्थित होते.

फोटो ओळ:- सोयी-सुविधांची उपलब्धता या विषयी सखोल माहिती देणाऱ्या हॉस्पिटलओम या अॅपचा शुभारंभ प्रसंगी आ. आशुतोष काळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *