
कोपरगाव प्रतिनिधी:-
साईबाबांच्या पावनभूमी साईआश्रया परिवार शिर्डी येथे दि. २२ जुलै २०२१ रोजी साईआश्रया माहेरघर शिवणकाम गृह व लघु उद्योग हा शुभारंभ पार पडला
यावेळी परफेक्ट फौंडेशन च्या अध्यक्षा सौ.सुनीताजी कोडे व सौ. वंदना गोंदकर. भाजपा महिला मोर्चा,उत्तर नगर जिल्हा-संघटन सरचिटणीस यांच्या शुभहस्ते तसेच प्रमुख अतिथी श्री.कमलाकर साहेब कोते पा. शिवसेना व सचिनभाऊ तांबे पा. भाजपा आणी मा श्री.ओमप्रकाश (काकासाहेब) कोयटे. अध्यक्ष महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशन व सौ.सुहासिनीताई कोयटे समता परिवार हे मान्यवर उपस्थित होते

सर्व प्रथम साई आश्रयातील मुलांनी स्वागत गीत व भाक्तिगीत सादर केले यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून साईबाबांची आरती करण्यात आली सर्वांचे सत्कार करण्यात आले






यानंतर शिलाई मशीनची पूजा करून शुभारंभ करण्यात आला सर्व मान्यवारांनी छान असे मार्गदशन केले व शुभेच्छा दिल्या या नंतर माहिती देण्यात आली ज्यांना माहेरचे व सासरचे असे दोन्हीही सांभाळत नाही अशा अनाथ निराधार गरजू माहिलांसाठी माहेरघर हा प्रकल्प सुरू केला आहे अशा एकूण २१ महिला येथे साईआश्रय घेत आहेत अशा महिला व शिर्डी परिसरातील गरजू महिला तसेच कोरोना महामारीमुळे ज्यांचे घरातील कमावते पुरुष गमावले आहेत व सर्व जवाबदारी त्या महिलेवर आली आहे अशासाठी हा लघुऊद्योग प्रकल्प आत्मनिर्भर बनविण्यासाठी साईआश्रया माहेरघर शिवनकला गृह व लघु उद्योग प्रकल्प सुरु करत आहे या मध्ये कापडी पिशव्या ,मास्क,पेटीकोट,पायपूसनी तसेच मुलांचे युनिफॉर्म व राख्या बनविणे इत्यादी दैनंदिन वापराच्या वस्तु बनविणे तसेच सर्वाना शिवानकाम या द्वारे रोजगार मिळने शक्य नाही अशा महिलासाठी भाजी भाकरी चे सात्विक भोजन असा घरपोच डबा लवकरच सुरु करत आहोत यासाठी योग्य प्रशिक्षण देऊन बचत गट बनविले जातील त्यातून त्यांना रोजगार उपलब्ध होइल असे नियॊजन आहे. ओम साईराम साईसेवक – गणेश दळवी मो – 9637549300
