
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्याला साहित्यिक परंपरा समरूदध आहेच पण महिला लेखिकांनी सुद्धा मोलाची भर घातली आहे सन१९७५ चे दरम्यान कौशल्यादेवि गंगवाल नावांच्या प्राध्यापीका श्री सद्गुरू गंगागिर महाविद्यालयात असताना त्यांनी ग्रंथ लेखन केले आहे


आज लिहिणारा पैकी सौ शैलजा राजीव रोहोम हे नाव प्रकर्षाने घेतले जाते कोपरगाव साहित्यिक मंडळ महिला मंडळ आणि सामाजिक सेवाभावी वृत्तीने सदैव समाजजागृती साठी प्रयत्न करत आपल्या कौशल्याने लेखनीने समाजात आपला एक वेगळा ठसा निर्माण केला आहे लेखनाबरोबरच यांनी गायन कला जोपासली आहे अनेक कविता गाणी गाऊन सादर करतात
ईतर सर्व लेखन करताना ८/१०/२०१९ रोजी आपल्या मनातील भावना श्री साई माहात्म्य ओवि बद्ध करून भक्तांसाठी साई जीवन कार्यावर प्रकाश टाकला आहे अगोदर चे चरित्र सहजी सामान्य माणसाला समजून येत नव्हते ते सुलभतेने उपलब्ध करून दिले आहे साई समाधि शताब्दी वर्ष प्रसंगी हे ओविबदध चरित्र उपलब्ध झाल्याने भक्तांना आनंद झाला सौ शैलजा राजीव रोहोम परिवार खूप पूर्वीपासून श्री साई भक्त असल्यामुळे घरातूनच भक्ती परंपरा असल्याने आपोआप लेखिकेला ओविबदध चरित्र लिहिण्याची प्रेरणा मिळाली
साईंच्या श्रद्धा सबुरीचा मार्ग सबका मालीक एक हि प्रेरणा ग्रंथ पूर्ण करण्यासाठी पुरेशी ठरली
सदरचा ग्रंथ समजण्यासाठी तो मुळातच पूर्ण पणे वाचणे आवश्यक आहे तरच तो आकलन होणार आहे
सौ शैलजा रोहोम यांनी केलेली साईंची सेवा साईचरणी अर्पण करून आजच्या गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा भावि लेखनास हार्दिक शुभेच्छा अतीशय सुंदर ग्रंथ देऊन भक्ती रसात भर घातली आहे म्हणून अभिनंदन
