युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या संकल्पनेतील ‘माझं किचन’ रेसिपी बुकचे प्रकाशन..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी
(नाशिक):-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या ‘माझं किचन’ या रेसिपी बुकचे माजी महानगरपालिका विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

पंचवटी परिसरातील हिरावाडी शक्तीनगर येथील सिद्धि विनायक गणपती मंदिर येथे या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका सुनीता शिंदे, अंजली गोवर्धने, मनिषा आहिरराव, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे , गौरव गोवर्धने व पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या ‘माझं किचन’ या रेसिपी बुकचे मकरसंक्रांतीच्या निमित्ताने पंचवटी परिसरातील महिलांना वाटप करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *