
कोपरगाव प्रतिनिधी :-
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव ग्रामीण व शहर या दोन्ही ठिकाणी पर्यावरणाचे समतोल रहावे व ग्लोबल वार्मीग कमी व्हावे या हेतूने जवळपास १० हजार वृक्ष दिले आहे.ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व शहरात नगरपरिषदेच्या माध्यमातून संगोपनाचे काम केले जाणार आहे.ग्लोबल वार्मिग मुळे हा जो पर्यावरणाचा समतोल राखला जात नाही यासाठी जास्तित जास्त वृक्ष लागवड करणे हे सर्व घटकांचे काम आहे. यासंदर्भात सभापती अर्जुनराव काळे म्हणाले की, आमदार आशुतोष दादा काळे सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात.जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दहा हजार वृक्षाचे वाटप त्यांनी केले आहे.हा उपक्रम जनतेसाठी आदर्श उपक्रम आहे.या उपक्रमांचे बद्दल आमदार आशुतोष दादा काळे यांचे कोपरगाव पंचायत समितीचे उपसभापती अर्जुनराव काळे यांनी आभार मानले आहे.तालुक्यात ७९ गावे ७५ ग्रामपंचायती मध्ये प्रत्येकी १०० वृक्ष वाटप केले आहे.उर्वरित वृक्ष शहरात वाटप केले आहे.मागणी वाढल्यास आमदार आशुतोष दादा काळे यांच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिले जाईल असे उपसभापती अर्जनराव काळे म्हणाले आहे.या जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने हा जो उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे.या उपक्रमास जनतेने साथ देवून तालुक्यात जास्तीत जास्त वृक्ष लागवडीचे नियोजन करावे.तसेच या वृक्षाचे संगोपन करुन पर्यावरणाला हातभार लावावा असे जनतेला आव्हान उपसभापती अर्जुनराव काळे यांनी केले आहे.
