
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला बिग्रेडची आ. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत निवड..!!
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- महिला भगिनी आणि पाणी यांचे अत्यंत जवळचे नाते आहे. त्या महिला शहरातील असो वा खेड्यातील त्याला अपवाद नाही. प्रत्येक महिला भगिनींचा पाणी हा चिंतेचा विषय. कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक गावात उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवत असते. कोपरगाव शहरात तर कायम प्रत्येक घरासमोर दोनचार पाण्याच्या टाक्या हमखास पाहायला मिळतात. त्यामुळे हे चित्र भविष्यात बदलायचे आहे. शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरु करून साठवण क्षमता वाढविण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर वितरण व्यवस्थादेखील सुधारावी लागणार आहे. त्यासाठी माझा पाठपुरावा युद्ध पातळीवर सुरु आहे. कोपरगाव शहरासह मतदार संघातील महिलांची पाण्याची वणवण थांबविणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
कोपरगाव येथे आ. आशुतोष काळे यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी यांची निवड करण्यात येऊन त्यांना आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते पदवितरण करण्यात आले याप्रसंगी नूतन पदाधिकारी महिलांना मार्गदर्शन करतांना आपल्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, महिला भगिनींच्या विचारविनिमयातून ज्यावेळी कुटुंबाच्या सुखदुःखाच्या चर्चा होत असतात त्यावेळी महिला आपल्या अडी-अडचणी देखील एकमेकींना सांगत असतात. महिलाच-महिलांच्या अडीअडचणी समजून घेऊ शकतात. त्यामुळे या अडचणी जोपर्यंत महिलांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येत नाही तोपर्यंत त्या अडचणी सुटणार नाही. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नूतन पदाधिकारी महिलांनी अशा महिला भगिनींच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार प्रत्येक महिलांपर्यंत पोहचवावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे. पक्षाची प्रतिमा आणि नेत्याची कामगिरी प्रत्येक घरात पोहचविण्यासाठी मोलाची कामगिरी महिलांच्या मार्फत होत असते. त्यामुळे नूतन पदाधिकारी महिलांनी आपली जबाबदारी ओळखून पक्षासाठी व सामाजिक कार्यासाठी वेळ देवून माता-भगिनींना येत असलेल्या अडचणींची माहिती मिळवून या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा महिला वर्गांमध्ये पोहचविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावे.
प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे या मागील अनेक वर्षापासून महिला बचत गटाचे काम करीत आहे. बचत गटाच्या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी त्यांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ निर्माण व्हावी यासाठी मागील काही वर्षापासून गोदाकाठ महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. त्याचबरोबर आपला सामाजिक, सांस्कृतिक ठेवा जतन करण्यासाठी दरवर्षी नवरात्रोत्सवात जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रम आयोजित करून महिलांच्या कला-गुणांना वाव मिळावा यासाठी खुले व्यासपीठ निर्माण करून दिले आहेत. प्रत्येक महिला आपल्या समस्या मांडतातच असे नाही महिलांच्या समस्यांची महिलांनाच जाणीव असते त्यासाठी प्रत्येक महिला भगिनीने आपल्या समस्या पुढे येऊन मांडल्या पाहिजेत या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. आहे.

यावेळी सौ. रेखा जगताप यांची अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस सचिवपदी, सौ. स्वप्नजा वाबळे यांची अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेस सचिवपदी व सौ. वैशाली आभाळे यांची कोपरगाव तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.तसेच राष्ट्रवादी महिला शहर उपाध्यक्षपदी भाग्यश्री गणेश बोरुडे, चंद्रभागा हिंगे, सुषमा पांडे, निता डाके, सविता कापडे, स्नेहल पुणेकर, मनीषा दिक्षित, शन्नो पठाण, छाया फरताळे, कविता जिरे, राष्ट्रवादी महिला शहर सचिवपदी कविता जिरे, बेबीआपा चांद पठाण, शितल वायखिंडे, विमल गायकवाड, पूनम पाटोळे, सारिका मोरस्कर, निर्मला सोनवणे, भारती शिंपी, सरला खालकर, योगिता भांगे, नीरा साळवे, उषा उदावंत, रुपाली कळसकर, निमा गावित, रत्ना पाठक राष्ट्रवादी महिला शहर संघटकपदी आशा भिंगळे, सुनिता हजारे, पूजा देवळालीकर, बेबी वाकचौरे, मनीषा बागडे, अलका सोनवणे, सोनाली फुलपगारे, शैला देवरे, कविता शिलेदार, मनिषा डाके, राणी गोर्डे, शकुंतला मोरे, जिजाबाई उगले, सुलताना शेख, राष्ट्रवादी शहर युवती कार्याध्यक्षपदी अश्विनी नरोडे, उपाध्यक्षपदी डॉ.वर्षा रोकडे, ज्योती आव्हाड, कावेरी राऊत,सचिवपदी
दिक्षा उनवने, निकिता लासुरे, पूनम कदम, उज्वला कोंढरे, अनिता अनिल परदेशी तर संघटकपदी तनया डुबे, वैष्णवी महाजन यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, महिला शहराध्यक्ष सौ. प्रतिभा शिलेदार, नगरसेवक मंदार पहाडे, संदीप पगारे, हाजीमेहमूद सय्यद, वर्षाताई गंगूले, माधवी वाकचौरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, राजेंद्र वाकचौरे, राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, फकीर कुरेशी, रमेश गवळी, दिनकर खरे, सुनील बोरा, डॉ. तुषार गलांडे, रावसाहेब साठे, सचिन परदेशी, चंद्रशेखर म्हस्के आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
