शब्द पाळणे:- गोरेसर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
उधारीचे प्राक्तन बदलल क्रेडिट म्हटलं की कसं बरं वाटतं … लाखो रुपयांच्या वस्तू तुम्हाला ‘ क्रेडिट वर मिळतात घरापासून ते काय वाट्टेल तेहप्त्यावर आणणं ही कमालीची प्रतिष्ठेची गोष्ट झाली आहे … उधारी जितकी जास्त , तितके तुम्ही प्रतिष्ठित ‘ असे आज मानले जाते … माझ्या डोक्यावर कुणाचा एक रुपया शिल्लक नाही …. असं पूर्वी उजळ माथ्यानं म्हटलं जाई … आज लक्षावधी रुपयांचं कर्ज तुमच्यावर शिल्लक असणं हे उजळ माथ्यानं मिरवण्याचं लक्षण आहे . पूर्वी ‘ शब्द पाळणे या गोष्टीला सर्वात मोठी किंमत होती … दिलेला शब्द पाळण्यासाठी लोक जिवाचं सर्वस्व पणाला लावत , पण आता दिवस बदलले .. दिलेला शब्द पाळणारा , दिलेली वेळ पाळणारा माणूस म्हणजे भलताच बावळट , मागसलेला मानलाजातो . दिलेला शब्द योग्य वेळी मोडणारा , लिहिलेला शब्दही ऐन वेळी फिरवणारा , पाठविलेला चेक न वटता परतवणारा दिलेला पैसे ठरलेल्या वेळी न देणारा असा माणूस भलताच प्रतिष्ठित झाला आहे … खरंच दिवस किती बदलले ? अजून आपण मात्र पूर्वीचेच राहिलो.
काही चुकतंय का … ?

सुलेखन – गोरे सर 9850613612 कोपरगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *