सुयोग्य नियोजन करून लॉक डाऊन शिथिल करावा:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
गेल्या एक दिड वर्षांपासून करोना साथीच्या आजाराने सर्वच व्यवहार ठप्प झाले असून पुन्हा लॉक डाऊन लावण्यापेक्षा सुयोग्य नियोजन करून लॉक डाऊन शिथिल करावा अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड. नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की गेल्या दिड वर्षपासून सुरू असलेल्या करोना साथीच्या आजाराला थोपवण्यासाठी लॉक डाऊन वर लॉक डाऊन जाहीर करण्यात आले मात्र लॉक डाऊन मुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहे त्यामुळे गोरगरिबांपुढे जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला आहे अनेकांना मोल मजुरी केल्याशिवाय दोन वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली आहे कोविड च्या आजाराने मृत होणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढत असले तरी आता लॉक डाऊन जाहीर झाल्यास नागरिकांचे भूक बळी पडू शकतात
अनेक नागरिक वेगवेगळ्या आर्थिक विवंचनेत आहेत त्यामुळे पुन्हा लॉक डाऊन करू नये अशीच मागणी नागरिक करत आहे मात्र लॉक डाऊन करण्यापेक्षा प्रशासनाने गर्दी होणार नाही या करिता योग्य ते नियोजन करावे तसेच हवे तर विनाकारण गर्दी करणारावर कडक कारवाई करावी छोट्या मोठ्या व्यावसायिक व विक्रेत्यांना दुकान उघडण्यासाठी विशिष्ट वेळा ठरवून द्याव्यात तसेच नियम तोडणारावर प्रसंगी कठोर कडक कारवाई करावी मात्र पुन्हा लॉक डाऊन जाहीर करण्यापूर्वी नागरिक व व्यावसायिक यांच्याशी चर्चा करून सुयोग्य नियोजन करावे मात्र आता पुन्हा लॉक डाऊन जाहीर करून नागरिकांचा अंत पाहू नये असेही या पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *