
कोपरगाव प्रतिनिधी:-
लायन्स क्लब ऑफ कोपरगावच्या अध्यक्षपदी रामदासजी थोरे, उपाध्यक्षपदी परेशजी उदावंत, सेक्रेटरीपदी अक्षयजी गिरमे व खजिनदारपदी सुमितजी भट्टड यांची निवड झाल्याबद्दल १ जुलै रोजी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी त्यांचा सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, संचालक पद्माकांतजी कुदळे, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथजी जामदार, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनीलजी गंगूले, युवक तालुकाध्यक्ष चारुदत्तजी सिनगर, शहराध्यक्ष नवाजभाई कुरेशी, नगरसेवक गटनेते वीरेनजी बोरावके, मंदारजी पहाडे, संदीपजी पगारे, हाजी मेहमूद सय्यद, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनीलजी शिलेदार आदी उपस्थित होते.
