
कोपरगाव प्रतिनिधी:-
समर्थ ग्रुप कोपरगाव आयोजित एक छोटा हात मदतीचा…
आपणही या समाजाचे काही तरी देण लागतो या हेतुने समर्थ ग्रुप चा एक छोटासा अंडी वाटपाचा उपक्रम २०० घरांना २००० अंडी वाटप करण्यात आली. येथून मागे सुध्दा समर्थ ग्रुपने ऑक्सीमिटर, सँनिटायझरचे , गोशाळेत गायींना घास , मुकबधीर विद्यालयाला नाष्टा व भोजनाचे, गरिबांना ब्लँकेट वाटप , कोरोना काळात पत्रकारांचा सन्मान , सोशल डिस्टंसिंगचे पालन करून हा उपक्रम करण्यात आला.

यावेळी शुभम गवारे
अमोल आढाव,
मयूर लचुरे, मनोज दरपेल,संदीप लचुरे, स्वप्नील पवार, सोनू लचुरे, निलेश लचुरे,रवी लचुरे, सुमित गवारे, शिवा साठे, सौरभ मुसळे,विकी पवार,साई गुप्ता, सार्थक दिक्षित, अनिकेत ओढेकर उपस्थित होते.
तुम्ही सरकारसाठी एक आकडा आहे, पण तुमच्या घरच्यांसाठी जीवाचा तुकडा आहे असे म्हणत हा कार्यक्रम संपन्न झाला.
