

कोपरगाव प्रतिनिधी:-
विवेकभैय्या कोल्हे यांनी नाकारला सत्कार..
युवकांनी विवेकभैय्यांच्या कामाने प्रेरित होऊन त्यांच्या सेवाकार्याबद्दल सत्कार करण्यासाठी संजीवनी कोविड सेंटरला गेले असता विवेकभैय्या कोल्हे यांनी मोठ्या मनाने माझा सत्कार घेण्याची ही वेळ नाही आणि जो पर्यंत कोपरगाव मतदारसंघ संपूर्ण कोरोनामुक्त होत नाही तो पर्यंत सत्कार घेणे मला मान्य नाही..

खरा सत्कार तर कोरोनात अहोरात्र लढणारे प्रशासकीय अधिकारी,डॉक्टर,वैद्यकीय कर्मचारी,स्वच्छता कर्मचारी,पोलीस यांचा करायला हवा आहे…

तसेच एकही रुग्ण आढळणार नाही तेव्हा खरी लढाई आपन जिंकलो आहोत असे होईल..अशी भावना विवेकभैय्या कोल्हे यांनी अचानक समोर सत्कार करण्यासाठी उभ्या युवकांसमोर व्यक्त केली…या प्रसंगी उपस्थित सर्वजण विवेकभैय्या कोल्हे यांचे प्रगल्भ विचारांनी भारावून गेले होते..
माणूस असावा तर असा…
