
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगांव शहरांतील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत १९ फेब्रुवारी २०२२ छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहाने संपन्न झाली.
विदयालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन लायन्स क्लब चे अध्यक्ष राम थोरे आणि लायन तुलसी खुबाणी यांच्या हस्ते झाले.त्या प्रसंगी जनार्देन स्वामी हाॕस्पीटलचे प्रसाद कातकडे, लायन सुधीर डागा,ला.राजेंद्र शिरोडे,ला.अक्षय गिरमे,ला.डाॕ.तुषार गलांडे,ला.राजेंद्र शिंदे आदि उपस्थित होते.
या वेळी विदयालयाचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, कोपरगांव एज्युकेशन सोसा.अध्यक्ष कैलास ठोळे ,सचिव दीलीप अजमेरे ,सहसचिव सचिन अजमेरे आदींनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.
विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.श्री.एस.डी.गोरे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.पर्यवेक्षक आर.बी. गायकवाड यांनी आभार मानले.
या कार्यक्रमला जेष्ठ शिक्षक श्री.डी.व्ही.तुपसैंदर,ए.बी.अमृतकर, एन.के.बडजाते,इ.एल.जाधव,कोताडे ए.जे,एस.एन.शिरसाळे आदी शिक्षक,शिक्षिका सोशल डीसटन्स पाळुन उपस्थित होते.
