
एसएपी प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांनी मिळविले यश , सुरूवातीस रू 4.5 लाखांचे वार्षिक पॅकेज…
कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित एमबीए, इंजिनिअरींग, पाॅलीटेक्निक, फार्मसी, सिनिअर काॅलेज मधिल विध्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळवुन देवुन पालक व विद्यार्थ्यांची नोकरदार होण्याची स्वप्ने पुर्ण करण्यासाठी संजीवनीच्या माध्यमातुन अनेक प्रयत्न करण्यात येतात. याचाच एक भाग म्हणुन संजीवनीने एसएपी या प्रशिक्षण देणाऱ्या जागतिक पातळीवरील कंपनीशी सामंजस्य करार केला केला आहे. या कंपनीचे एक केंद्र संजीवनी मध्ये असुन या केंद्राद्वारे विध्यार्थ्यांना प्रशिक्षण देवुन सक्षम केल्या जाते. अलिकडेच या केंद्रातुन प्रशिक्षण घेतलेल्या २०२०-२१ च्या बॅचमधिल संजीवनीच्या ५ विद्यार्थ्यांची १७१ देशात विस्तार असलेल्या आयबीएम या मुळच्या अमेरिकन कंपनीने रू ४. ५ लाखांच्या वार्षिक पॅकेजवर नोकऱ्यांसाठी निवड केली आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात श्री कोल्हे यांनी म्हटले आहे आयबीएम कंपनीने निवड केलेल्यांमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या निखिल संभाजी भाकरे,

सुरज बाळासाहेब भाबड,

अमित अरूण चोथे,

सना शरिफ शेख व

शुभम सुरेश इंगळे

यांचा समावेश असुन हे सर्व विद्यार्थी ग्रामिण भागातील आहेत. इतरही कंपन्यांनी सॅपचे प्रशिक्षण घेतलेल्या विध्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या असुन त्यांचे निकाल या आठवड्यात जाहिर होवुन संजीवनीच्या विध्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मोठा व सुखद असा धक्का मिळणार आहे.
एसएपी या केंद्रामार्फत अॅडव्हान्सड् बिझिनेस अॅप्लीकेशन प्रोग्रामिंग (एबीएपी), मटेरिअल मॅनेजमेंट (एमएम), प्राॅडक्षन अँड प्लानिंग (पीपी), हुमन काॅम्प्युटींग मॅनेजमेंट (एचसीएम), फायनांसियल अकौंटींग (एफए) आणि सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन (एसडी) अशा प्रकारच्या कोर्सेचे प्रत्येकी २०० तासांचे प्रशिक्षण विध्यार्थ्यांना अधिकचे देवुन त्यांना मुलाखतींसाठी सक्षम केल्या जाते. एसएपी चे प्रशिक्षण संजीवनी व्यतिरीक्त इतर विध्यार्थ्यांसाठीही खुले असुन असे अनेक विध्यार्थी या प्रशिक्षणाचा फायदा घेवुन नोकऱ्या मिळवित आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी मंत्री श्री.शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष श्री. नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री. अमित कोल्हे व विश्वस्त श्री सुमित कारेल्हे यांनी निवड झालेल्या सर्व विध्यार्थी व त्यांचे पालक यांचे अभिनंदन केले. या सर्व विध्यार्थ्यांना डायरेक्टर (प्राचार्य) डाॅ. ए.जी.ठाकुर व एसएपी समन्वयक डाॅ. ए.बी. पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
