के. जे. सोमय्या महाविद्यालयात  करिअर्स इन कॉमर्स या विषयावर व्याख्यानाचे आयोजन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- के. जे. सोमैया महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या वतीने करीयर्स इन कॉमर्स या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. पुण्यातील सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट श्री. डांगी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाणिज्य शाखेचे जागतिक स्तरावरील महत्व व या शाखेतील विविध विषयांची उपयुक्तता समजावून सांगितली. पारंपरिक अभ्यासाला प्रत्यक्षिकाची व कृत्रिम बुद्धिमाता यांची जोड दिल्यास वाणिज्य शाखेचा एकही विद्यार्थी बेरोजगार राहणार नाही याची त्यांनी खात्री व्यक्त केली. प्रत्येक व्यवसायात अकौंटॅन्सी, कॉस्टिंग, विपणन, कायदा, प्रशासन व कर प्रणाली योग्यरित्या कार्यान्वित करण्यासाठी सॉफ्ट स्किल्सचा वापर करून वाणिज्य शाखेचा विद्यार्थी त्या व्यवसायाला यशस्वी करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो असे ते म्हणाले.
वाणिज्य विभाग प्रमुख प्रो. डॉ. संतोष पगारे यांनी श्री. डांगी यांचे स्वागत करून महाविद्यालय व वाणिज्य मंडळाची ओळख करून दिली. वाणिज्य मंडळ व त्या अंतर्गत स्थापन अमर्त्य सेन क्लब द्वारे आयोजित विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रो. रवींद्र जाधव यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. प्रो. डॉ. संजय अरगडे यांनी आभार प्रदर्शन केले तर प्रो. डॉ. रवींद्र जाधव यांनी सूत्र संचालन केले.
या व्याख्यानच्या आयोजनासाठी प्रा. अजित धनवटे, प्रा. सुनील गुंजाळ, प्रा. स्वागत रणधीर, प्रा. सोनाली आव्हाड, प्रा. विजय सोमासे, प्रा. हर्षदा पेडणेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्याणासाठी वाणिज्य शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *