सोमैया महाविद्यालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त स्त्री सबलीकरणावर व्याख्यान…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याला समर्थपणे साथ देत एकीकडे स्त्री शिक्षणाचे शिवधनुष्य उचलले तर दुसरीकडे स्त्रियांवरचे अन्याय अत्याचार संपवण्यासाठी देखील मोठा त्याग केला. त्या काळात पुण्यातील प्लेगच्या जीवघेण्या साथीत हजारोंच्या संख्येने मृत्युमुखी पडणाऱ्या जनतेला हात देत अनेकांना जीवदान दिले. अशाच एका घटनेत त्यांना स्वतःला प्लेग झाला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. अशा देवतुल्य समाज सुधारकांची आठवण ठेवून आजच्या सावित्रीच्या लेकींनी वाटचाल केली पाहिजे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी केले. स्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्त्री सबलीकरण कक्षाच्या वतीने आयोजित व्याख्यान सत्रात प्राचार्य डॉ. विजय ठाणगे बोलत होते. यावेळी वाणिज्य शाखाप्रमुख डॉ. संतोष पगारे व हिंदी विभाग प्रमुख डॉ. जी भाऊ मोरे यांची मुख्य उपस्थिती होती. डॉ. ठाणगे यांनी याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या संपूर्ण जीवन कार्याचे अभ्यासपूर्वक विवेचन करीत विद्यार्थी विद्यार्थिनींना मंत्रमुग्ध केले.
या व्याख्यान सत्राच्या दुसऱ्या वक्त्या प्रा. कोमल अडसरे यांनी देखील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक अधिक क्षेत्रातील योगदानावर अनेक दाखले देत प्रकाश ज्योत टाकला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत करताना स्त्री सबलीकरण कक्ष प्रमुख डॉ. नीता शिंदे यांनी स्त्री सबलीकरण विभागाची विस्तृत माहिती देत कार्यक्रमाचे औचित्य स्पष्ट केले त्यांनीदेखील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची गौरवगाथा नमूद करताना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने व्याख्यानाबरोबरच अन्य विविध उपक्रम घेण्यात येतील असे सांगितले. या या समारंभाला डॉ. बी. डी. गव्हाणे, प्रा. वर्षा आहेर, डॉ. बी. एस. गायकवाड, डॉ. शैलेंद्र बनसोडे, डॉ. संजय दवंगे, डॉ. रवींद्र जाधव तसेच अनेक महिला प्राध्यापिका व बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनींनी उपस्थिती दर्शवले
स्त्री सबलीकरण कक्षाच्या सदस्य डॉ. सुरेखा भिंगारदिवे यांनी उपस्थितांचे आभार मानले, प्रा. सायली भावसार यांनी सूत्रसंचालन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *