
….पंढरीचे सेवेकरी….
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ कर्तुत्व,नेतृत्व व वक्तृत्व लाभलेले व्यापारी नेते अग्रवाल चहा कंपनीचे संस्थापक श्री.नारायणशेठ अग्रवाल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
अत्यंत दानशुर व समाजसेवा करण्यात सतत पुढे असणारे श्री.नारायणशेठ कोपरगाव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.
आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी स्व.कैकाडी महाराज यांची मनमाड ते पंढरपूर पायी ( दिंडी )कोपरगाव येथून जाते गेली (28) वर्ष नारायणशेठ अग्रवाल निस्वार्थ सेवा करत आहे.
दर वर्षी वारकऱ्यांना ब्लँकेट,बॅग,रेनकोट, साहित्य वाटप करीत असत,
असंख्य गोरगरिबांना मदत करणारे श्री.नारायणशेठ कोपरगावातील असामान्य व्यक्तिमत्व !
श्री.नारायणशेठ म्हणजे धावपळ कुणाचा काहीतरी काम कोणाची अडचण कोणाला तरी मदत अशा धावपळीत पूर्ण दिवस जातो. तरी पण त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य कायम असते थोडक्यात त्यांना संकट मोचन म्हटल्यास अतिशययोक्ती ठरणार नाही. प्रतिष्ठित व्यापारी वर्गात श्री.नारायणशेठ यांना विशेष मान आहे.
कोपरगाव व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष व साई संजीवनी बँकेचे ज्येष्ठ संचालक आहे.
स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांच्या पासून कोल्हे कुटुंबाशी नारायणशेठ यांचे जिव्हाळाशी संबंध आहे.
श्री.नारायणशेठ अग्रवाल यांनी सामाजिक,साहित्य,व्यासायिक क्षेत्रात प्रशंसनीय काम केल्याची पावती म्हणून “सकाळ” च्या वतीने “गौरवगाथा २०२५- स्टोरीज ऑफ एक्सलन्स” या पुस्तका मध्ये मानाचे स्थान देण्यात आले.
सेवेकऱ्यांचा सेवेकरी असणारे, ऋषीतुल्य व्यक्तिमत्व आमचे भाऊ.. तुम्हाला पुनश्च एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
