
कोपरगाव प्रतिनिधी:-
दि.१४ मे २०२१ रोजी कोपरगाव कोरोना वॉर रूम च्या माध्यमातून अक्षय तृतीया पवित्र रमजान ईद तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सामाजीक ऐक्यतेचा संदेश देत आज ऍम्ब्युलन्स राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती रामेशगिरी महाराज,आ.आशुतोष काळे,युवानेते विवेकभैय्या कोल्हे,जनार्दन स्वामी आश्रमाचे विश्वस्त बाळासाहेब चव्हाण,ऍम्ब्युलन्स साठी मदत करणारे साईपालखी निवारा,निमगाव चे संचालक श्री.भाई ठाकूर(विरार) यांचे विश्वासू उद्योजक योगेश तिय्या,कोपरगाव कोरोना वॉर रूम चे मुख्य समन्वयक तुषार पोटे यांच्या हस्ते करण्यात आले,

१ मे पासून कोरोना वॉर रूम कोपरगाव मध्ये सूरी झाली असून आत्ता पर्यंत जवळपास 393 कोपरगाव तालुक्यातील तसेच 188 नगर जिल्ह्यातील रुग्णांनी त्याचा यशस्वी लाभ घेतला आहे,फोनद्वारे सर्व प्रकारची मदत पोहचवण्यात यावेळी वॉर रूम चे सदस्य शुभम गायकवाड,वासुदेव शिंदे,रितेश राऊत,आदिनाथ कराळे,आकाश हलवाई,प्रितम काटकर,शुभम औरंगे,स्वराज सूर्यवंशी,रौनक अजमेरे,शुभम तांबे,हृषीकेश कानडे आदींच्या उपस्थितीत सोशल डिस्टनसिंग पळून पार पडला.यावेळी मान्यवरांनी कोपरगाव कोरोना वॉर रूम च्या सुरू असलेल्या कामास शुभेच्छा देत पुढील वाटचालीस मार्गदर्शन तसेच सूचना दिल्या,अत्यंत कमी कालावधीमध्ये कोपरगाव कोरोना वॉर रूम ने जिल्हाभर कोरोना रुग्णांस मदत पोहचवून कोपरगावचे नाव जिल्हाभर सकारात्मक पोहचवले आहे असे रामेशगिरी महाराज यांनी सांगत कार्यास शुभेच्छा दिल्या.
कोपरगाव कोरोना वॉर रूम
मदत नव्हे कर्तव्य..!
