मुहूर्त अक्षयतृतीयेचा,, योग परशूराम जन्मोत्सव ,बसवेश्वर जयंतीचा:- सुशांत घोडके…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
अक्षयतृतीया…
पितृ,देव यात अक्षयतृतीया शुभतिथी मानली जाते.वसंतोत्सव,दोलोत्सव,चंदनयात्रा दिन,आखाती अशा अनेक नावाने हा सण भारतातील प्रत्येक घरात साजरा केला जातो.या तिथीला चांगले कार्य व दिले दान अक्षय टिकते.श्रीकृष्णाने अक्षयतृतीयेचे व्रत युधिष्ठिराला सांगितले होते.या दिवसापासून शेती कामास शेतकरी अनेक ठिकाणी कार्यारंभ करतात.वृक्षलावून संवर्धन केल्याने जिवंतपणी अक्षय आनंद व नंतर मोक्षप्राप्ती होते.असे वराहपुराणात उल्लेख आहे.या दिवशी सोनेखरेदीला विशेष महत्व आहे.

परशूराम जन्मोत्सव…
शंकराकडून भगवान परशूराम यांनी परशू हे शस्त्र घेतले आणि अनेक विद्या आत्मसात केल्या. त्याच विद्यांच्या जोरावर त्यांनी दुष्ट राजांच्या जोखडातून प्रजेला मुक्त केले…म्हणून परशूराम जन्मोत्सव साजरा केला जातो.

बसवेश्वर जयंती…
शंकराचे उपासक महात्मा बसवेश्वर यांनी १२ व्या शतकात भारतातील विविध भाषा व परंपरेचा अभ्यास केला.गरीब-श्रीमंत,उच-निच,स्त्री-पुरुष,वर्णभेद,जाती भेद नष्ट करून सामाजिक समरसतेचा पाया रचला.सर्वसमावेशक संसद व्यवस्था (अनुभव मंडप) त्या काळात प्रत्यक्षात आणली… म्हणून महात्मा बसवेश्वर जयंती.
सर्वांना…
भगवान परशूराम आणि महात्मा बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा…
स्वच्छता राखा…
पाणी जपून वापरा…
तोंडाला नियमित मास्क लावा…
हात वेळोवेळी साबण व पाण्याने धुवा…
प्रत्येकाशी सुरक्षित अंतर ठेवा…
झाडे लावा झाडे जगवा
जय परशूराम…जय बसवेश्वर…
जय हिंद |
– सुशांत घोडके
संस्थापक – सूर्यतेज (संस्था),परिवार, कोपरगांव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *