
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरात महाशिवरात्री निमित्ताने दि १ मार्च २०२२ रोजी महाशिवरात्री असुन कोरानाच्या संकटामुळे दोन वर्ष जत्रेचे आयोजन केले गेले नाही. मात्र यावर्षी शहरातील बाजारतळात महाशिवरात्री निमित्ताने जत्रा भरली जाणार असुन कोपरगावकर आणी लहान मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दि १ मार्च पासुन जत्रेला सुरुवात होत असुन बाजारात विविध पाळणे आणी दुकाने थाटण्यास सुरुवात झाली
आहे.


पाळण्यामध्ये चोरी प्लेन पाळणा,आकाशी पाळणा, स्लेबो ब्रेक डान्स (झटके वाला)ड्रेगन ट्रेन लहान मुलांचे चक्री बॉन्सी पाळणे या जत्रे निमित्त आले आहे. त्याचे काम काज चालु आहे. या निमित्ताने नगरपरिषदचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी म्हणाले की, या जत्रेत नागरिकांनी सोशल डिस्टन सन्स पाळावे, तोडाला मास्क वापरून कोरानाचे सर्व नियम पाळावे या जत्रे निमित्ताने कोपरगावकरांमध्ये आंनद निर्माण झाला आहे. औरंगाबाद चाळीसगाव धुळे आदि भागातून पाळण्याचे मालक असुन कोरोना नंतरची कोपरगावची हि पहिलीच जत्रा आहे.कोरोना नंतर दोन तिन वर्षानंतर जत्रा बाजारतळावर आयोजित केल्यामुळे कोपरगावकरांचे मनोरंजन होणार आहे.
