डॉ. अभिजीत गाढवे डी. एम. न्यूरोलॉजिस्ट म्हणूनबॉम्बे हॉस्पीटलमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
कोपरगांव येथील डॉ. अभिजीत चंद्रकांत गाढवे हे मुंबई येथील प्रसिध्द बॉम्बे सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमधून डी. एम. न्यूरोलॉजिस्ट (मेंदू व मज्जासंस्था विकारतज्ञ्ज) परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. सन २०२२ मध्ये राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (नीट) मधून शासनातर्फे त्यांची बॉम्बे हॉस्पीटलमध्ये डी. एम. न्यूरोलॉजी या शिक्षणासाठी निवड करण्यात आली होती. तीन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करुन नुकत्याच झालेल्या परीक्षेत त्यांनी प्रथम श्रेणीत यश संपादन केले.
डॉ. अभिजीत गाढवे हे कोपरगांव येथील गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी कोपरगांव येथील सेवानिकेतन स्कूलमधून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण सदगुरु गंगागिरी महाराज महाविद्यालयातून पूर्ण केले. या दोन्हीही ठिकाणी त्यांनी प्रथम प्राविण्य मिळविलेले आहे. तर मुंबई (सायन) येथील लोकमान्य टिळक शासकीय महाविद्यालयामध्ये एम. बी. बी. एस. शिक्षण पूर्ण केल्यानंतर लोणी येथील मेडिकल कॉलेजमध्ये पुढील वैद्यकीय क्षेत्रातील एम. डी. मेडिसिन हे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यातही विशेष प्राविण्यासह ते उत्तीर्ण झाले होते. वैद्यकीय अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबल डॉ. गाढवे यांना प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयाची वैद्यकीय क्षेत्रातली महत्वाची समजली जाणारी एम. डी. मेडिसिन (औषध तज्ज्ञ) ही पदवी देखील सप्टेंबर २०२१ मध्ये प्राप्त झालेली आहे. त्यानंतर राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (नीट) चांगल्या श्रेणीने ते उत्तीर्ण झाल्यानंतर शासकीय कोट्यामधून डिसेंबर २०२२ मध्ये बॉम्बे सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये डी. एम. न्युरोलॉजी या शिक्षणासाठी त्यांची निवड झालेली होती.
डॉ. अभिजीत गाढवे यांच्या या यशाबद्दल राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे चेअरमन डॉ. राजेंद्र विखे पाटील, खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील, गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांच्यासह विविध स्तरातून अनेकांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *