कोपरगांव पिपल्स बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न व १५ % लाभांष जाहीर…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:- कोपरगांव पिपल्स बँकेची ७४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि . १८.० ९ .२०२२ रोजी दुपारी ४.०० वाजता बँकेच्या विस्तारीत इमारतीतील सभागृहात उत्साहाच्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात चेअरमन श्री . सत्येन सुभाष मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन सर्व विषय एकमताने मंजुर करण्यात आले बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत चेअरमन श्री . सत्येन मुंदडा यांनी मनोगत व्यक्त करून बँकेच्या भविष्यातील प्रगती बाबतची रूपरेषा मांडली व १५ % प्रमाणे सर्व सभासदांना लाभांष मंजूर करण्यात आला आहे असे घोषीत केले . यावेळी व्यासपीठावर बँकेचे विद्यमान चेअरमन श्री . सत्येन मुंदडा , व्हा . चेअरमन सौ . प्रतिभा शिलेदार व संचालक मंडळ सदस्य श्री . कैलासचंद ठोळे , डॉ . श्री . विजयकुमार कोठारी , श्री . सुनिल कंगले , श्री . रविंद्र लोहाडे , श्री . धरमकुमार बागरेचा , श्री . कल्पेश शहा , श्री . अतुल काले , श्री . राजेंद्र शिंगी , श्री . वसंतराव आव्हाड , श्री . सुनिल बंब , श्री . रविंद्र ठोळे , श्री . हेमंत बोरावके , सौ . प्रभावती पांडे , श्री . संजय भोकरे , श्री . प्रसन्ना काला , व्यवस्थापन मंडळ सदस्य श्री . संदीप रोहमारे , श्री . विजय नायडू , श्री . अभिमन्यु पिंपळवाडकर , श्री . धनंजय शेळके , सेवक संचालक श्री . विरेश पैठणकर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . दिपक एकबोटे इत्यादी उपस्थित होते . सदर सभेमध्ये काही विषयावर श्री . केशव भंवर , श्री . अजित लोहाडे , श्री . प्रदीप नवले व श्री . उल्हास गवारे या सभासदांनी सभेत सहभागी होऊन काही प्रश्नांवर चर्चा केली व बँकेला दि . २ ९ .१०.२०२२ रोजी ७५ वे वर्षे सुरू होणार आहे या अमृत महोत्सवाची आठवण म्हणुन बँकेने सर्व सभासदांना भेट वस्तु देण्याबाबत श्री . बबनराव शिलेदार व श्री अजय शिंदे यांनी सुचना मांडली त्यांच्या प्रश्नांना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . दिपक एकबोटे यांनी अभ्यासपूर्ण व समाधानकारक उत्तरे दिली . बँकेचे चेअरमन श्री . सत्येन मुंदडा यांनी उपस्थितांचे स्वागत केले . व असि . जन . मॅनेजर श्री . जितेंद्र छाजेड यांनी बँकेचे मागील सभेचे इतिवृत्तांचे वाचन केले व श्री . चंद्रशेखर व्यास , वरिष्ठ अधिकारी यांनी आभार मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *