
कोपरगाव प्रतिनिधी:-
भाजपा (वसंत स्मृती कार्यालय)
येथे भाजपाच्या निवडक कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.
कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद व सर्व प्रभागातील नगरसेवक पदाची निवडणूक लढविण्याचे यावेळी ठरविण्यात आले.यावेळी माजी नगराध्यक्ष श्री. विजयराव वहाडणे व श्री. विनायकराव गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
उपस्थित सर्वच भाजपा कार्यकर्त्यांनी आपापले विचार मांडून नगरपरिषद निवडणूक लढविण्याचे ठरविण्यात आले.
कोपरगाव नगरपरिषदेचा कारभार करतांना श्री. विजयराव वहाडणे यांनी कुठलाही पक्षीय किंवा धार्मिक भेदभाव न करता सर्वच प्रभागात
विकासकामे केलेली आहेत.
केलेल्या विकासकामांची कर्तव्य ही पुस्तिकाही त्यांनी प्रकाशित केलेली आहे. आजपर्यंत कुणीही असा अहवाल प्रकाशित करून जनतेसमोर ठेवलेला नाही.
केलेली विकासकामे जनतेसमोर ठेवून निवडणूकीला सामोरे जाण्याचे ठरविण्यात आले. सर्वांनाच न्याय देण्याचा प्रयत्न केल्यामुळे पाच वर्षात जनतेचा एकही मोर्चा नगरपरिषदेवर आला नाही. सर्व नगरसेवक- नागरिक-ठेकेदार व नगरपरिषद कर्मचारी यांना सोबत घेवून काम करणाऱ्या व्यक्तीला पुन्हा नगराध्यक्षपद मिळाल्यास कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास होईल म्हणून निवडणूक लढविण्यास सर्वांनी दिले.नगराध्यक्ष झाल्यापासून ते आजपर्यंत श्री. विजयराव
वहाडणे सर्वसामान्य जनतेसाठी
नेहमीच उपलब्ध आहेत हे सर्वच नागरिकांना माहित आहे.
