योगेश कोरडे यांचे स्मरण पत्रसृष्टीला कायम राहील मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांची भावपूर्ण श्रद्धांजली…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(पुणे):-
‘‘महिनाभरापूर्वी माझ्या वडिलांचे निधन झाले, माझ्यासाठी तेव्हढेच धक्कादायक निधन मराठी पत्रकार परिषदेच्या परिवारातील योगेश कोरडे यांचे आहे. योगेश हा केवळ परिषदेचा उपाध्यक्ष नव्हता तर तो एक कुशल संघटक, उमद्या मनाचा एक लढाऊ पत्रकार मित्र होता. योगेशला योग्य उपचार मिळावेत यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पण यश आले नाही. दुर्दैवाने आपले प्रयत्न अपूर्ण पडले, योगेश झुंज हरला. ज्येष्ठ पत्रकार मा. गो. वैद्य यांचा गौरव समारंभ परिषदेने नागपूरला घेतला होता, त्याची सर्व जबाबदारी योगेशवर होती. ती त्याने समर्थपणे पार पाडत देखणा कार्यक्रम करून दाखविला. नागपूर जिल्हा पत्रकार संघ भक्कम आणि अधिक क्रियाशिल करण्यात योगेशचे मोठे योगदान होते. काही दिवसांपूर्वी पत्रकार संतोष पवार गेला, आता योगेश गेला. दोघेही परिषदेचे भक्कम आधार स्तंभ होते. योगेशला श्रद्धांजली वाहण्याची वेळ आपल्यावर आली. मी आज अत्यंत दु:खी असून योगेश, तुझे कायम स्मरण होत राहील, मराठी पत्रकार परिषद योगेशच्या योगदानाला विसरणार नाही’’ या शब्दात मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी आपले तरुण सहकारी व मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष योगेश कोरडे (कळमेश्वर नागपूर) यांना श्रद्धांजली अर्पण केली.
अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष योगेश कोरडे यांची आज शुक्रवारी प्राणज्योत मालवली. मागील काही महिन्यांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्यावर उपचारही सुरु होते. त्यांची आर्थिक परिस्थिती नाजुक होती त्यामुळे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी केलेल्या आवाहनानुसार मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्यभरातून दोन लाखांहून अधिक मदत गोळा झाली होती. त्यात धुळे, नंदुरबार, जळगावसह खान्देशच्या दात्यांचा मोठा सहभाग होता. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही काळाने झेप घातली व योगेश कोरडे यांची प्राणज्योत विझली. योगेश कोरडे यांच्या निधनाने पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक लढवय्ये नेतृत्व हरपले असून त्यांच्या निधनाने मराठी पत्रसृष्टी सुन्न झाली. योगेश कोरडे यांच्यावर आज सायंकाळी कळमेश्वर (नागपूर) येथे अन्त्यसंस्कार करण्यात आले आले. योगेश कोरडे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन लहान मुली व भाऊ असा परिवार आहे. खान्देशच्या पत्रसृष्टीच्या वतीने योगेश कोरडे यांना भावपूर्ण श्रद्धांज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *